Finland PM Sanna Marin apologizes for party photo summer home sakal
ग्लोबल

साना मरिन यांनी मागितली जाहीर माफी

अमलीपदार्थ घेतले नसल्याचेही सिद्ध

सकाळ वृत्तसेवा

कोपेनहेगन : फिनलंडच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये दोन महिला तोकडे कपडे घालून एकमेकींचे चुंबन घेत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर आरोपांचा सामना करावा लागत असलेल्या पंतप्रधान साना मरीन यांनी जनतेची माफी मागितली आहे. तसेच आणखी एका पार्टीमध्ये मरीन यांनी अमलीपदार्थांचे सेवन केल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. मात्र, मरीन यांनी स्वत:हून चाचणी केल्यानंतर त्यांनी अमलीपदार्थांचे सेवन केले नसल्याचे सिद्ध झाले.

फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन यांच्या निवासस्थानी झालेल्या पार्टीमध्ये त्या मित्रमैत्रीणींबरोबर नाचत असल्याचा आणि गाणी म्हणत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. तसेच, याच पार्टीमध्ये दोन महिला अत्यंत कमी तोकडे कपडे घालून चुंबन घेत असल्याचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते. साना मरीन यांनी पत्रकारांसमोर येत, ते छायाचित्र त्यांच्याच निवासस्थानाच्या बाथरूममधील असल्याचे मान्य केले. तसेच, जुलैमध्ये झालेल्या या पार्टी प्रकरणाबद्दल त्यांनी माफीही मागितली. ‘ते छायाचित्र आक्षेपार्ह होते, मी त्याबद्दल माफी मागते. संगीत महोत्सवानंतर आयोजित केलेली ती एक खासगी पार्टी होती आणि त्यातील सहभागींची नावे सुरक्षा व्यवस्थेला आधीच कळविण्यात आली होती. मात्र, आम्ही केवळ सरकारी निवासस्थानाच्या खुल्या जागेचा वापर केला. मरीन यांनी आणखी एका पार्टीमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये मद्याचे सेवन केले होते, मात्र अमलीपदार्थांचे सेवन केले नव्हते, चाचणीद्वारेही ते सिद्ध झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT