Istanbul nightclub esakal
ग्लोबल

Istanbul nightclub: इस्तांबूलमध्ये अग्नितांडव! नाईटक्लबच्या नूतनीकरणावेळी लागलेल्या आगीत 29 जणांचा मृत्यू

Istanbul Turkey News: तुर्कीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इस्तांबूलमधील एका नाईटक्लबमध्ये नूतनीकरणाचे काम सुरु होते.

कार्तिक पुजारी

इस्तांबूल- तुर्कीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इस्तांबूलमधील एका नाईटक्लबमध्ये नूतनीकरणाचे काम सुरु होते. यावेळी लागलेल्या आगीत कमीतकमी २९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी झाले असून यातील सात लोकांची स्थिती बिकट असल्याचं सांगण्यात येतंय. सीएनएन या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (fire at a nightclub undergoing repairs in Istanbul Turkey state media reports many died)

गव्हर्नर ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल इस्तांबूलच्या बेसिक्टस जिल्ह्यातील ही घटना आहे. हा प्रदेश यूरोपच्या बाजूला येतो. सर्व पीडित हे नाईटक्लबमध्ये काम करणारे मजूर असल्याचं कळतंय. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

आगीची घटना घडली तेव्हा नाईटक्लबच्या नूतनीकरणाचे काम सुरु होते. याप्रकरणी पाच जणांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. यामध्ये नाईटक्लबचे तीन मॅनेजर आणि नूतनीकरणासाठी कारणीभूत असलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. तुर्कीचे न्याय मंत्री Yilmaz Tunc यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

स्थानिक मीडियानुसार, घटनास्थळाची पाहणी, आगीच्या कारणांचा तपास सुरु आहे. तीन तज्ज्ञ टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग ज्याठिकाणी लागली ती जागा अंडरग्राऊंड होती असं कळतंय. त्यामुळे अनेकांना लवकर बाहेर पडता आले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

Devendra Fadnavis : 'जो राम का नही, ओ किसी काम का नही'; नाशिकच्या सभेत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Who is Mini Kohli ? विराट कोहलीसारखा दिसणारा 'तो' चिमुकला आहे तरी कोण? रोहितही म्हणालेला, विराट, बघ, तुझा डुप्लिकेट!

Nagpur Crime: नागपूरात ‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक !

SCROLL FOR NEXT