fire at Karachi Rawalpindi Tezgam express train today at Pakistan 
ग्लोबल

कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसला भीषण आग, 16 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

कराची : पाकिस्तानातील कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला आज (ता. 31) पहाटे भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 16 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.]

कराची-रावळपिंडी मार्गावर रहिम यार खान जवळ लियाकतपूर येथे ही भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच पोलिस व अग्निशमन दलांनी आग नियंत्रणात आणण्यास सुरवात केली आहे. इतर प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात येत आहे.  

कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसला कशामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. आग लागल्यानंतर काही वेळातच बचावकार्य सुरू झाले, पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांना वाचविण्यातही बऱ्याचशा अडचणी येत आहेत. सुरवातीला मृतांचा आकडा 10 वर होता, मात्र या भीषण आगीत आता 16 प्रवासी मृत्यूमुखी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, युद्धपातळीवर उपचार सूरू आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft Layoff: टेक क्षेत्रात पुन्हा मोठा धक्का! मायक्रोसॉफ्टने ४,८०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; एचआर प्रमुखांनी थेट कारणच सांगितलं

Raigad District Rain : रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Rajgad Rain : राजगड तालुक्यातील पासली खोऱ्यातील बालवड पूल पाण्याखाली; परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला

Mumbai Pune Railway Close : मुंबई-पुणे रेल्वे १५ तासांहून अधिक काळ ठप्प; सेवा केव्हा सुरू होणार?

ZIM vs BAN, ODI: झिम्बाब्वेने केला बांगलादेशचा गेम! चुरशीच्या लढतीत धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी

SCROLL FOR NEXT