रोम - इटलीमध्ये निर्बंध शिथील करत बागा, पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. तब्बल दोन महिन्यांनंतर बाहेर पडता आल्याने नागरिकांनी विविध प्रकारे आपला आनंद व्यक्त केला.
रोम - इटलीमध्ये निर्बंध शिथील करत बागा, पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. तब्बल दोन महिन्यांनंतर बाहेर पडता आल्याने नागरिकांनी विविध प्रकारे आपला आनंद व्यक्त केला. 
ग्लोबल

#Lockdown : या देशाने केले सर्वात पहिले लॉकडाउन शिथील

पीटीआय

रोम - कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यावर संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करणारा जगातील पहिला देश असलेल्या इटलीने आजपासून निर्बंध शिथील केले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितले. कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी इटलीने उद्योगांना कामकाजास परवानगी दिली असून नागरिकांनाही कामावर जाण्यास सांगितले आहे. येथे बागाही उघडल्या आहेत.  

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये इटली आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर येथील लोक आज घराबाहेर पडले आहेत. इटलीप्रमाणेच स्पेन, नायजेरिया, अझरबैजान, मलेशिया, इस्राईल, ट्युनिशिया आणि लेबनॉन या देशांनीही लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या आणि बळी असलेल्या अमेरिकेतही निम्म्या राज्यांनी दोन दिवसांपूर्वीच उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दररोजची कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे मार्चमध्ये असलेले १३ टक्के इतके प्रमाण गेल्या आठवड्यापासून दोन ते तीन टक्क्यांवर आल्याने युरोपीय देशांनी सुटकेचा निश्‍वास टाकत अर्थव्यवस्था सावरण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

जागतिक स्थिती

  • दररोज होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दोन महिन्यांतील सर्वांत कमी
  • वर्षअखेरपर्यंत लस तयार होण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विश्‍वास
  • चीनमधील वुहानमधील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू बाहेर पसरल्याचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा
  • न्यूझीलंडमध्ये आज एकही नवा रुग्ण नाही
  • ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या एक लाखांच्या वर जाऊनही खुद्द अध्यक्ष बोल्सोनारो यांचा लॉकडाउनला विरोध व्यक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT