First Tsunami Waves Hit Japan After 7 point 5 Quake 5 Metre Waves Expected Too 
ग्लोबल

Japan Earthquake: 7.5 तीव्रतेच्या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीची पहिली लाट धडकली, 5 मीटर उंच लाटेची शक्यता

First Tsunami Waves Hit Japan जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता जास्त असून त्सुनामीची पहिली लाट जपानमध्ये धडकली आहे. जपान सरकारने अलर्ट जारी केला असून नागरिकांना उच्च ठिकाणांवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे

कार्तिक पुजारी

टोकयो- जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता जास्त असून त्सुनामीची पहिली लाट जपानमध्ये धडकली आहे. जपान सरकारने अलर्ट जारी केला असून नागरिकांना उंच ठिकाणांवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाच्या ३०० किलोमीटर अंतरापर्यंत त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (First Tsunami Waves Hit Japan After 7 point 5 Quake 5 Metre Waves Expected Too)

भूकंपाची तीव्रता मोठी असल्याने चिंता वाढली आहे. माहितीनुसार, वजिमा शहरात १.२ मीटर उंचीची पहिली लाट किनाऱ्यावर धडकली आहे. येत्या काळात त्सुनामीच्या आणखी लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. दाव्यानुसार ५ मीटर उंचीच्या लाटांची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागाचे नुकसान होऊ शकते.

जपानच्या यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या होंशू बेटावरील नोटो भागात ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप आला. त्यानंतर ७.६ तीव्रेतेचा दुसरा भूकंप झाला. त्यानंतर आणखी काही भूकंप सातत्याने झाल्याचे सांगितले जाताहेत. ७.६ तीव्रतेच्या भूकंपानंतर प्रशासन हाय अलर्ट मोडवर गेले आहे. नागरिकांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं आहे.

एनएचकेनुसार, जपानचा पश्चिमी किनारा आणि अन्य भागात तीन मीटरपर्यंत उंचीच्या लाटा येऊ शकतात. जपानमध्ये भूकंप येण्याच्या घटना या काही नवीन नाहीत. मात्र, कितीही काळजी घेतली तरी काही प्रमाणात का होईना नुकसान होतेच. काही वर्षांमध्ये त्सुनामीमुळे जपानच्या अणुभट्टीचे नुकसान झाले होते. त्यामुळे मोठे संकट ओढवले होते. त्यामुळे यावेळी सतर्कता घेतली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT