donald trump corona 
ग्लोबल

मोठी बातमी! अमेरिकेत लसीकरण सुरु; ट्रम्प यांनी जगाचं केलं अभिनंदन

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेत लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली असून देशातील १४५ ठिकाणी लस पोचवण्याचे काम सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन अमेरिका आणि जगाचे अभिनंदन केलं आहे. अमेरिकेत लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. सुरुवातीला 5 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. यादरम्यान व्हाइट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना लस मिळवण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष माईक पेन्स यांनाही लस देण्याची शक्यता आहे. याशिवाय नवे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांनाही लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अमेरिकेत अनेक टप्प्यांत लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. लस वितरणाची जबाबदारी जनरल गुस्ताव पेरना यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मते, या आठवड्याअखेरीस सर्व राज्यात सुमारे ३० लाख लशींचे वितरण केले जाईल. मालट्रक आणि जहाजाच्या मदतीने लस वितरण केले जात आहे. गेल्या आठवड्यातच सरकारने फायजर आणि बायोएनटेकला आपत्कालीन काळात लस वापरण्याची परवानगी दिली. अमेरिकी औषध प्रशासन (एफडीए) आणि साथरोग नियंत्रण कक्ष (सीडीसी) यांनी लसीकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे.

अमेरिकी आरोग्य विभागाच्या पाच जणांना लस देऊन लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाला किक ऑफ इव्हेंट असे नाव देण्यात आले आहे. या पाच जणांना वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्ज वॉशिंग्टन यूनिर्व्हसिटी हॉस्पिटलमध्ये लस दिली गेली. ही सर्व मंडळी आरोग्य कर्मचारी आहेत. त्यानंतर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. सर्वसामान्यांसाठी पुढील आठवड्यात लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.

निम्म्या लोकसंख्येसाठी व्यवस्था

अमेरिकेने मॉडर्नाला दहा कोटी अतिरिक्त लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात अमेरिकेने मॉडर्नाकडून एक लाख डोस खरेदी केले होते. एकूण ३० कोटी अतिरिक्त डोस खरेदी करण्याचे लक्ष्य अमेरिकी प्रशासनाने ठेवले आहे. प्रत्येक रुग्णाला दोनदा लस द्यावी लागणार आहे. यानुसार १५ कोटी नागरिकांना दोनदा लस दिली जाईल. अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटी असून यानुसार निम्म्या लोकसंख्येसाठी लसीची सोय करण्यात आली आहे.

युवतीची छेड काढल्याने उसळली दंगल; दोन गटात तुफान दगडफेक

लशीसाठी व्हाइट हाऊसला प्राधान्य नाही

अमेरिकेमध्ये फायजर या कंपनीच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आल्यानंतर मुख्य लसीकरण प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान ही लस सर्वप्रथम घेणाऱ्यांमध्ये आपण किंवा व्हाइट हाऊसमधील कर्मचारी नसतील असे ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान याधी न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सर्वात आधी कोरोनावरील ही लस अध्यक्षांच्या जवळ असलेल्या लोकांना देण्यात येईल, असे म्हटले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

SCROLL FOR NEXT