Fish has a Human Like Face 
ग्लोबल

Video: माशाचा चेहरा चक्क 'माणसा'सारखा...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण एका माशाचा चेहरा चक्क माणसाच्या चेहऱयासारखा आहे. माशाचे नाक, डोळे आणि माणसाप्रमाणे असणारे तोंडही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आगळा-वेगळा मासा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मासा चीनमधील एका गावामधील नदीत दिसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 14 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मासा नदीतून किनाऱ्याच्या दिशेने येताना दिसत आहे. माशाचा चेहरा माणसाच्या चेहऱ्यासारखा कसा काय दिसतोय? याबद्दल नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'चीनमधील मियाओ गावातील एका नदीत माशाचा व्हिडिओ एका महिलेने मोबाईलमध्ये शूट केला आहे. संबंधित व्हिडिओ चीनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.' दरम्यान, या व्हिडिओबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, माणसासारख्या दिसणाऱ्या या माशाबद्दल मोठी उत्सुकता दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

Honey Singh News: हनी सिंगचा पाय आणखी खोलात? महाराष्ट्र सायबर सेलने काय दिला अल्टिमेटम?

दमदार संवाद, प्रभावी अभिनय; पण एक गोष्ट खटकते! कसा आहे राजकुमार रावचा ‘प्रहार’?

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाआधी दिल्लीत हायअलर्ट; अभिजीत दिपके राहत असलेल्या घराबाहेर पोलीस दाखल

Ankita Bhandari Case: २४ तासांत बेड्या अन् ८८ दिवसांत ५०० पानांचे चार्जशीट; महिला DIG च्या नेतृत्वाखालील SIT तपास ठरला निर्णायक

SCROLL FOR NEXT