ambergris 
ग्लोबल

मच्छीमाराला मिळाली व्हेल माशाची उलटी; रातोरात झाला कोट्यधीश

सकाळवृत्तसेवा

बँकॉक: उलटीसारखा प्रकार पहायला कुणालाही आवडणार नाही. मात्र, या उलटीनेच थायलँडच्या एका मच्छीमाराला कोट्यधीश बनवलं आहे. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? हो. पण असंच घडलंय. कारण या मच्छीमाराच्या हाती अशी तशी उलटी नाही तर चक्क व्हेल माशाची उलटी लागली आहे. महिन्याला अगदी जुजबी म्हणजे केवळ 500 पाऊंड्स कमावणाऱ्या या मच्छीमाराने असा विचारही केला नसेल कि ज्या गोष्टीला तो एक समुद्री दगड समजत होता तो वास्तवात एक 24 लाख पाऊंड रुपयांचा Ambergris होता.

Ambergris ला समुद्री खजाना म्हटलं जातं. तसेच याला सोन्याहून काही कमी समजलं जात नाही. या Ambergris मध्ये गंध नसलेले अल्कोहोल असतं. याचा उपयोग परफ्यूमचा वास मोठ्या काळासाठी राखण्यासाठी केला जातो. थायलँडच्या नारिस सुवानसांग या मच्छीमाराला समुद्राच्या किनाऱ्यावर हा तुकडा मिळाला होता. त्या तुकड्याला घरी घेऊन आल्यावर त्याबद्दल त्याला काही वेगळीच गोष्ट समोर आली. 
एवढी किंमत का? व्हेल माशाच्या शरिरातून एक खास तत्त्व बाहेर पडतं. काही अभ्यासानुसार, व्हेल याच्या मदतीने पचन करु शकतो. तर काही लोकांचं म्हणणं आहे की, Ambergris व्हेल माशाच्या विष्ठेत समाविष्ट असतं. महाग आणि मोठ्या ब्रँड्स याच्या मदतीने परफ्यूमच्या वासाला मोठ्या काळासाठी टीकवून ठेवतात. या मच्छीमाराने जेंव्हा या Ambergris च्या एका छोट्या तुकड्याला जाळलं आणि ते पाघळल्यानंतर त्याच्या वासाने त्याला समजलं की आपल्या हाती काय घबाड लागलंय. विशेष म्हणजे याचं वजन जवळपास 100 किलो आहे. तसेच Ambergris चा हा आतापर्यंत सापडलेला सर्वांत मोठा तुकडा आहे. 

कोटीमध्ये मिळाली किंमत
नारिस यांचं म्हणणं आहे की, त्यांना एका उद्योगपतीने वचन दिलंय की जर या Ambergris क्वालिटी चांगली निघाली तर त्यांना याची 23,740 पाऊंड प्रति किलो इतकी किंमत मिळेल. भारतीय चलनामध्ये याची किंमत 25 कोटी रुपये होते. नारिस सध्या स्पेशालिस्टकडून याच्या तपासणीची वाट बघत आहेत. तसेच याची माहिती त्यांनी पोलिसांनाही दिलीय कारण याच्या किंमतीची बातमी पसरल्यानतंर त्याच्या चोरी होण्याचा धोकाही बळावला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT