एस. जयशंकर  sakal
ग्लोबल

जगासमोर अन्नसुरक्षेचे नवे आव्हान : जयशंकर

अमेरिकेबरोबर एकत्रित सामना करण्यास तयार

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगातील अस्थिरतेच्या स्थितीमुळे विविध आव्हानांबरोबरच अन्न सुरक्षेचे आव्हानही जगासमोर उभे ठाकले आहे, असा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज दिला. या आव्हानांचा अमेरिकेबरोबर एकत्रितरित्या सामना करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारत आणि अमेरिका यांच्यातील परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री पातळीवरील ‘टू प्लस टू’ चर्चेला सुरुवात झाली असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याबरोबर विविध द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनीही अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टीन यांच्याबरोबर चर्चा केली. यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी निवेदन केले. ‘युक्रेनमधील युद्ध थांबावे, हीच भारताची इच्छा आहे. मात्र, अशा प्रकारच्या संकटांमुळे ऊर्जा सुरक्षा, महागाईवाढ, मर्यादित पुरवठा ही जगासमोरी नवी आव्हाने आहेत. अन्न सुरक्षेचीही समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. सध्या जगभरात असलेल्या अस्थिरता आणि अनिश्‍चिततेच्या वातावरणाबाबत धोरणात्मक दिशा ठरविण्यासाठी मंत्रिपातळीवरील ‘टू प्लस टू’ चर्चेचा फायदा झाला,’ असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितले.

रशियाकडून तेलखरेदी कमीच

रशियाकडून तेल खरेदी केल्यावरून भारतावर टीका होत असताना जयशंकर यांनी या टीकेला आज तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. ‘रशियाकडून युरोप एका दिवसात जितकी तेलखरेदी करतो, त्यापेक्षाही कमी तेल आम्ही त्यांच्याकडून एका महिन्यात खरेदी करतो. त्यामुळे टीकाकारांनी त्यांच्या टीकेचे रोख आधी युरोपकडे वळवावा. देशातील ऊर्जा सुरक्षेसाठी आम्हाला रशियाकडून काही प्रमाणात खरेदी करावी लागते,’ असे जयशंकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT