S Jayshankar Sakal
ग्लोबल

'जेवढ्या लवकर होईल, देश सोडा', लष्कराने सत्तांतर घडवून आणल्यावर 'या'देशात राहणाऱ्या भारतीयांना निर्देश

ज्या भारतीयांचे नायजरमध्ये राहणे महत्वाचे नाहीये, त्यांना लवकरात लवकर नायजर देश सोडण्याचा सल्ला दिला जातोय.

सकाळ डिजिटल टीम

Niger Military Rule: आफ्रिकन देश नायजरमध्ये जवळपास दोन आठवड्यांआधी सत्तांतर बघायला मिळाले. अशातचं, केंद्र सरकारने भारतीय नागरिकांसाठी काही निर्देश दिले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची शुक्रवारी (दि.११ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत म्हणाले की नायजरमधील घटनेवर आमचे लक्ष आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ज्या भारतीयांचे नायजरमध्ये राहणे महत्वाचे नाहीये, त्यांना लवकरात लवकर नायजर देश सोडण्याचा सल्ला दिला जातोय.

ते पुढे म्हणाले की नायजरमध्ये सध्या विमान सेवा बंद करण्यात आली आहे, यावर भारतीयांनी लक्ष्य द्यावे. अशा परिस्थितीत जर, ते रस्त्याने देश सोडण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत असतील, तर सुरक्षिततेचा विचार करुन सावधानता बाळगावी.

निर्देशांमध्ये पुढे सांगण्यात आलंय की आगामी काळात काही लोक नायजरला जाण्याची तयारी करत आहेत, त्यांनाही परिस्थिती सामान्य होईपर्यंत आपल्या निर्णयावर परत विचार करण्याचा सल्ला देण्यात येतोय. त्याचबरोबर, नायजरची राजधानी नियामी येथील भारतीय दूतावासामध्ये अजून ज्या लोकांनी नोंदणी केली नाही, त्यांनी लवकरात लवकर भारतीय दूतावासात स्वत:ची नोंदणी करावी,असा सल्ला देण्यात आला. (Latest Marathi News)

आपातकालीन संपर्कासाठी सरकारने नंबर जारी केलाय. भारतीय नागरिक नियामीमधील भारतीय दूतावासाच्या +२२७ ९९७५ ९९७५ या क्रमांकावर संपर्क करु शकतात. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना विचारण्यात आले की नायजरमध्ये सध्या किती भारतीय नागरिक आहेत? याच उत्तर देताना म्हणाले की जवळपास २५० भारतीय नागरिक आहे.

नायजरमध्ये लष्कराचं राज्य

नायजरच्या सेनेने राष्ट्रपतींना सत्तेतून हटवले आणि देशाची सत्ता आपल्या हाती घेतली. जवळपास दोन आठवड्यांआधी नायजरचे राष्ट्रपती मोहम्मद बजोम यांना सेनेने ताब्यात घेतलं आणि देश लष्कराच्या नियंत्रणात असल्याची घोषणा केली. कोणताही देश मदतीसाठी पुढे येऊ नये यासाठी सेनेने आपल्या सीमा बंद करुन घेतल्या आहेत.(Latest Marathi News)

नायजरमधील लष्करी राजवटीसाठी राष्ट्रपती मोहम्मद बजोम यांना जबाबदार धरण्यात येतंय. निवडणूकीच्या वेळी त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता की ते या देशाचे नागरिक नसून परदेशी आहेत. मोहम्मद बजोम अरब अल्पसंख्याक समुदायाचे आहेत. मात्र, हा समुदाय बऱ्याच वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये स्थलांतरित झाले होते, पण स्थानिक लोकांनी त्यांना अजूनही स्वीकारलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT