Ashraf Ghani File Photo
ग्लोबल

पैशांनी भरलेल्या ४ गाड्या अन् हेलिकॉप्टर घेऊन पळाले राष्ट्रपती घनी

हेलिकॉप्टरमध्ये पैसा ठेवण्यास जागा नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना काही रक्कम मागे सोडावी लागली.

दीनानाथ परब

काबुल: तालिबानने काबुलपर्यंत (Taliban kabul) धडक दिल्यानंतर रविवारी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडला. देशबाहेर पलायन करतान अश्रफ घनी यांनी चार कार आणि हेलिकॉप्टरभरुन पैसा (money) सोबत नेला. हेलिकॉप्टरमध्ये पैसा ठेवण्यास जागा नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना काही रक्कम मागे सोडावी लागली. काबुलमधील रशियन दूतावासाने (Russian embassy) हा दावा केला आहे.

घनी सध्या कुठे आहेत, या बद्दल कुठलीही माहिती नाहीय. काल ते ओमानमध्ये असल्याची माहिती होती. लवकरच ते अमेरिकेत आश्रयासाठी जाणार असल्याचे बोलले जात आहे. रक्तपात टाळण्यासाठी आपण देश सोडला, असे घनी आपल्या देश सोडण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हणाले.

रशिया काबुलमध्ये आपली राजनैतिक उपस्थिती कायम ठेवणार आहे. तालिबान सोबत संबंध सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. अफगाणिस्तानचे सत्ताधीश म्हणून त्यांना लगेच मान्यता देणार नाही. त्यांच्या वर्तनाचा जवळून अभ्यास केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

"अश्रफ घनी देश सोडत असताना त्यांच्या चारही कारस पैशांनी भरलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अन्य रोकड हेलिकॉप्टरमध्ये ठेवली. पण तिथेही पैसा ठेवण्यास जागा नसल्यामुळे अखेर त्यांना पैसा मागे सोडावा लागला" असे निकिता इस्चेनकोव यांनी सांगितले. ते काबूलमधील रशियन दूतावासाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी रॉयटर्सलाही हेच सांगितले. प्रत्यक्षदर्शी सूत्राने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा दावा केला.

रशियाची भूमिका काय आहे?

रशियाचे राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांनी तालिबानच्या वर्तनाचं कौतुक केलं आहे. तालिबानची भूमिका चांगली, सकारात्मक आणि व्यवसाय अनुकूल असल्याचे दिमित्री म्हणाले. "या कट्टरपंथीय इस्लामिक गटाने आधीच्या राज्यकर्त्यांपेक्षा २४ तासात काबुलला सुरक्षित बनवले" असे दिमित्री यांचे मत आहे.

"काबूल शहरात सर्वत्र शांतता आणि चांगली परिस्थिती आहे. अश्रफ घनी यांच्यापेक्षा तालिबानच्या नेतृत्वाखाली काबुलमधली परिस्थिती चांगली आहे" असे दिमित्री झिरनोव्ह मॉस्कोच्या रेडिओ स्टेशन बरोबर बोलताना म्हणाले. "काल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे घनी यांची राजवट कोसळली. कायदा-सुव्यवस्था ढासळून गेल्याचे चित्र होते. लुटारु रस्त्यावर आले होते" असे दिमित्री म्हणालेच रॉयटर्सने वृत्त दिलेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT