Ashraf Ghani File Photo
ग्लोबल

अश्रफ घनी ओमानमध्ये, तजाकिस्तानने विमानाच्या लँडिंगला नाकारली परवानगी

तालिबानने काबुलमध्ये प्रवेश करताच अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देश सोडून पळाले.

दीनानाथ परब

काबूल: तालिबानने काबुलमध्ये (Taliban kabul) प्रवेश करताच देश सोडून पळालेले अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी (Ashraf Ghani) सध्या ओमान मध्ये असल्याची माहिती आहे. ते तजाकिस्तानमध्ये आश्रय घेणार असल्याचे वृत्त होते. पण तजाकिस्तानने त्यांच्या विमानाला लँडिंगची परवानगी नाकारली. अश्रफ घनी अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. माजी एनएसए मोहीब सुद्धा घनी यांच्यासोबत ओमानमध्ये आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

ओमानमधून ते अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान संकटात असताना, देश सोडून पळाल्यामुळे अश्रफ घनी यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. त्यांनी आज सकाळी सोशल मीडियावरुन आपली बाजू मांडली. रक्तपात टाळण्यासाठी आपण अफगाणिस्तान सोडलं, असं त्यांनी सांगितलं.

अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार, रक्तपात टळावा. सरकार आकाराला यावे, यासाठी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि अब्दुल्लाह अब्दुल्लाह तालिबानशी बोलणी करण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबान त्यांना कसा प्रतिसाद देते, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे.

मागच्या काही दिवसांपासून एक-एक प्रांत काबीज करणाऱ्या तालिबानने (Taliban) अखेर काबुल (Kabul) वर नियंत्रण मिळवलं आहे. ३४ पैकी २५ प्रांत तालिबानच्या ताब्यात आहेत. यामध्ये कंदहार, हेरात, मझार-ए-शरीफ आणि जलालाबाद अशी मोठी शहर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

Man Ki Baat : बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’मध्ये कौतुक

Latest Marathi News Update : उध्दव ठाकरे कधीही जबाबदारी टाळणारा नाही - उद्धव ठाकरे

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

SCROLL FOR NEXT