Benazir Bhutto murder case
Benazir Bhutto murder case  sakal
ग्लोबल

Pervez Musharraf Death : बेनजीर भुट्टोंच्या हत्येत परवेज मुशर्रफ यांचाच होता हात?

सकाळ डिजिटल टीम

Pervez Musharraf Death : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं आज दिर्घ आजाराने निधन झालं. ते दुबईतील रुग्णालयात उपचार घेत होते. मुशर्रफ यांना अमाइलॉइडोसिसचा आजार होता. पाकिस्तानच्या सेनेत असो की राजकारणात त्यांची महत्त्वाची भूमिका राहली.

कारगिल युद्धात सुद्धा त्यांनी खलनायकाची भूमिका घेतली होती. अनेकदा ते वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले. त्यातलंच एक कारण होतं जेव्हा बेनजीर भुट्टोंच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता... आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत (Former Pakistani president Pervez died Benazir Bhutto murder case pakistan)

बेनजीर भुट्टोंची हत्या

 पाकिस्‍तानची पहिली महिला पंतप्रधान बेनजीर भुट्टोंची हत्या ही आजही अंगावर काटा आणते. २७ डिसेंबर २००७ ला रावलपिंडीच्या लियाकत बागमध्ये एका निवडणूक रॅलीमध्ये भुट्टो यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आजही त्यांची हत्या करणाऱ्या लोकांना कोणतीही शिक्षा मिळाली नाही. भुट्टोची हत्‍या आजही एक रहस्‍य आहे.

सीनियर जर्नलिस्‍ट हामिद मीर यांनी सांगितल्याप्रमाणे बेनजीर यांना त्यांच्या हत्‍येची पुर्वकल्पना काही दिवसापूर्वीच आली होती. त्यांनी असं सांगितलंही होतं की त्यांची हत्या केली जाऊ शकते. एवढंच काय तर त्यांना हे पण माहिती होतं की तिला कोण मारु शकतं.

हामिदच्या मते बेनजीर यांना माहिती होतं की विरोधी लोकं त्यांना पाकिस्तानमध्ये राहू देणार नाही. मात्र त्यांनी हुकूमशहा परवेज मुशर्रफचे आदेश ऐकण्यास नकार दिला आणि जीवाला धोका असतानाही बेनजीर यांनी पाकिस्तान सोडले नाही.

बेनजीर भुट्टोच्या हत्येत परवेज मुशर्रफचा हात होता?
बेनजीर यांनी आपल्या हत्येच्या दोन महिन्यापूर्वीच हामिद मीर यांना सांगितले होते की जर त्यांची हत्या झाली तर सर्व तालिबान किंवा अल कायदाला दोषी ठरवणार मात्र त्यांच्या हत्येला मुशर्रफ जबाबदार असतील.

बेनजीर यांच्या मते मुशर्रफ यांना निवडणूकीपूर्वी भूट्टो यांना मायदेशी परत येताना पाहायचं नव्हतं. जेव्हा भूट्टो यांनी हुकूमशाहाचं ऐकलं नाही तेव्हा मुशर्रफ यांनी त्यांना फोनवर धमकी देण्यास सुरवात केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT