Cardinal George Pell Dies
Cardinal George Pell Dies esakal
ग्लोबल

Italy : पोप फ्रान्सिसचे माजी सल्लागार कार्डिनल जॉर्ज पेल यांचं निधन; लैंगिक अत्याचारप्रकरणी ठरले होती दोषी

सकाळ डिजिटल टीम

मृत्यूपूर्वी कार्डिनल जॉर्ज पेल वादात अडकले होते. बाल लैंगिक अत्याचारात दोषी आढळल्यानंतर ते तुरुंगात सहा वर्षांची शिक्षा भोगत होते.

पोप फ्रान्सिसचे माजी वरिष्ठ सल्लागार कार्डिनल जॉर्ज पेल (Cardinal George Pell) यांचं इटलीची राजधानी रोम (Italy Rome) इथं निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चर्च अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर हृदयविकाराच्या गंभीर आजारामुळं त्यांचा मृत्यू झाला. कार्डिनल पेल यांनी पोपच्या शीर्ष सहाय्यकांपैकी एक होण्यापूर्वी मेलबर्न आणि सिडनी या दोन्हींचं मुख्य बिशप म्हणून काम केलं.

मृत्यूपूर्वी कार्डिनल जॉर्ज पेल वादात अडकले होते. बाल लैंगिक अत्याचारात दोषी आढळल्यानंतर ते तुरुंगात सहा वर्षांची शिक्षा भोगत होते. त्यांच्यावर दोन किशोरवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्यानंतर कोर्टात ते दोषी सिद्ध झाले. मात्र, नंतर त्यांना या आरोपातून मुक्त करण्यात आलं.

मार्च 2019 मध्ये झाली शिक्षा

पोप फ्रान्सिसचे माजी वरिष्ठ सल्लागार पेल यांना डिसेंबर 2018 मध्ये न्यायाधीशांनी दोषी ठरवलं होतं. यानंतर मार्च 2019 मध्ये सहा वर्षांची शिक्षा झाली. शिक्षा सुनावताना काउंटी कोर्टाचे मुख्य न्यायाधीश पीटर किड यांनी दोन मुलींवर अत्याचार केल्याच्या पेलच्या गुन्ह्याचं वर्णन 'पीडितांवर निर्लज्ज आणि जबरदस्ती लैंगिक अत्याचार' असं केलं. पेलनं पीडितांचा विश्वासघात केला आणि आपल्या अधिकाराचा वापर केला, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् मंत्री आलमगीर आलम यांना अटक; सचिवाच्या नोकराकडे सापडले होते ३७ कोटी

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांच्या रोड शोला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

Jintur Crime : चाकूने भोसकून गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; दोन अटकेत, जिंतूर शहरातील घटना

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानला दुसरा धक्का! जैस्वाल पाठोपाठ संजू सॅमसनही स्वस्तात बाद

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

SCROLL FOR NEXT