Found on Mars Strengthen the possibility of being a living 
ग्लोबल

मंगळावर आढळले सरोवर ; जीवसृष्टी असण्याच्या शक्‍यतेला बळकटी 

पीटीआय

टाम्पा (अमेरिका) : मंगळाच्या पृष्ठभागाखाली प्रथमच एक मोठे सरोवर असल्याचे आढळून आले असून, यामुळे तेथे जीवसृष्टीचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. इटलीच्या संशोधकांना हे सरोवर सापडले आहे. याबाबतचे संशोधन त्यांनी अमेरिकेतील एका विज्ञानविषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध केले आहे. 

मंगळावरील बर्फाच्या थराखाली हे सरोवर असून, त्याची लांबी जवळपास वीस किलोमीटर आहे. मंगळ ग्रहावर सापडलेला पाण्याचा हा सर्वांत मोठा साठा आहे. हे सरोवर बर्फाच्या थराखाली दीड किलोमीटर खोलीवर आहे. मंगळावर तात्पुरत्या कालावधीसाठी पाण्याचे प्रवाह होते, ही समजूत या नव्या शोधामुळे चुकीची ठरली असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मंगळावर कायमस्वरूपी पाण्याचा साठा असून, त्यामुळे जीवसृष्टीला पोषक वातावरणही असण्याची शक्‍यता आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

मंगळ हा थंड आणि कोरडा ग्रह असला, तरी कधी काळी त्यावरील वातावरण अधिक उष्ण होते. सुमारे 3.6 अब्ज वर्षांपूर्वी या ग्रहावर पाण्याचे प्रचंड साठे होते. त्यामुळे या ग्रहावर त्या पाण्याच्या साठ्याचा शोध घेण्याच्या निमित्ताने "मंगळावर जीवसृष्टी आहे का, अथवा होती का?,' या प्रश्‍नाचा शोध घेण्याचा संशोधक अव्याहत प्रयत्न करीत आहेत. आजच्या या शोधामुळे मंगळ मोहिमेवर मानवाला पाठविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT