Four dead in newest Ebola outbreak in Congo 
ग्लोबल

धक्कादायक ! कोरोनानंतर इबोलाचा नव्याने उद्रेक; चार जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना आफ्रिकेमधील काँगो देशात इबोला या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याची नवीन सहा प्रकरणे समोर आली आहेत. या सहा जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं एक पत्रकही जारी केलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एप्रिल महिन्यामध्येच येथील बेनी शहरात इबोलामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. असे असताना आता या ठिकाणापासून जवळजवळ हजार किलोमीटर दूर असणाऱ्या ठिकाणी म्हणजेच म्बानडाका शहरामध्ये इबोलाचे रुग्ण अढळून आले आहेत. त्यामुळे या विषाणूने एवढा लांब पल्ल्यावरील अंतर कसे कापले यासंदर्भात तर्क वितर्क मांडले जात आहेत. आता हे इबोलाचे नवे केंद्र असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यामध्ये काँगोमध्ये २० महिन्यांच्या इबोलाविरोधात मोहीमेनंतर इबोलामुक्तीची घोषणा करण्यात येणार होती. मात्र त्याच्या तीन दिवस आधीच देशामध्ये इबोलाची नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. १३ एप्रिल रोजी काँगोमध्ये इबोला विषाणूजन्य तापाची दहावी साथ संपल्याचे जाहीर करण्याची तयारी जागतिक आरोग्य संघटनेने केली होती. मात्र, १० एप्रिल रोजी २६ वर्षीय पुरुषाचा आणि १२ एप्रिल रोजी एक तरुण मुलीचा मृत्यू झाल्याने इबोलामुक्ती झाली नाही हे स्पष्ट झाले.

इबोलामुळे नेमका काय त्रास होतो?
इबोलामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ताप येत असतो. हा विषाणू वटवाघळात सापडतो. पण वटवाघळांना त्यामुळे काही होत नाही ज्या लोकांना संसर्ग होतो ते मात्र तापाने आजारी पडतात. माकडे, काळविटे त्याने संसर्गित होतात. त्यांच्यातूनही हा विषाणू माणसात येतो. ताप, स्नायूदुखी, उलट्या, अतिसार, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अंतर्गत व बा रक्तस्राव अशी लक्षणे असतात. काँगोतील नदीच्या नावावरून या विषाणूला इबोला हे नाव देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red object in galaxy : अवकाशात दिसले रहस्यमयी लाल ठिपके, पृथ्वीवर होणार गंभीर परिणाम? नेमका विषय काय, जाणून घ्या..

Anurag Thakur : सशक्त भारतासाठी मोदींची पंचसूत्री आवश्‍यक; माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Latest Marathi News Updates : पुलावरून वाहत्या पाण्यातून तहसीलदारांनी टाकली गाडी

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

SCROLL FOR NEXT