Four year old girl dies of alcoholism
Four year old girl dies of alcoholism Four year old girl dies of alcoholism
ग्लोबल

चिमुकलीने चुकून घेतला व्हिस्कीचा घोट; आजीने पाजली अर्धी बॉटल अन्...

सकाळ डिजिटल टीम

चार वर्षीय मुलीच्या मृत्युप्रकरणी आजी आणि आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षा देण्यासाठी आजीने मुलीला जबरदस्तीने दारूची अर्धी बॉटल (Alcohol) पाजली. ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. यावेळी मुलीची आई हे सर्व करताना मूकपणे पाहत होती. (Four year old girl dies of alcoholism)

डेली मेलच्या वृत्तानुसार, आजी रोक्सेन (५३, रा. लुईसियाना, अमेरिका) हिने चार वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने व्हिस्कीची अर्धी बॉटल पाजली. यावेळी मुलीची आई काझा (२८) हे कृत्य शांतपणे उभी राहून पाहत होती. दारू पाजल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू (death) झाला. पोलिसांनी रोक्सेनसोबत काजावरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती मिळताच पोलिस रोक्सनच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. मुलीने आजीच्या व्हिस्कीचा एक घोट (Alcohol) घेतला होता. यामुळे ती चिडली होती. शिक्षा देण्यासाठी आजीने मुलीला जमिनीवर गुडघे टेकण्यास भाग पाडले आणि बाटलीतील अर्धी व्हिस्की जबरदस्ती पाजली, असे मुलीच्या भावंडांनी पोलिसांना सांगितले.

जबरदस्तीने व्हिस्की प्यायल्यानंतर मुलीच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण वाढले आणि मृत्यू झाला. मुलीच्या रक्तातील अल्कोहोलची (Alcohol) पातळी .०६८ होती. जी २१ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी .०८ च्या कायदेशीर मर्यादेच्या आठ पट असल्याचे तपासात समोर आले आहे. रोक्सनने घटनास्थळी तपासकर्त्यांना सांगितले की ‘मी चूक केली. मुलीच्या मृत्यूची जबाबदारी घेते. मी सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्त केले.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT