tokyo olympic 
ग्लोबल

जपानमध्ये चौथी लाट धोक्याची घंटा; टोकिओ ऑलिम्पिकवरही टांगती तलवार

सकाळन्यूजनेटवर्क

टोकिओ- जगातील अनेक देशात कोरोना महामारी थैमान घालत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरली असून दुसरी लाट आल्याचं दिसत आहे. तर असेही देश आहेत, ज्याठिकाणी कोरोना महामारीची तिसरी लाट झाली आहे. जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. कोरोना निर्बंथ शिथिल केले जात असताना जपानमध्ये चौथ्या लाटेचे आगमन झाले आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा येऊ घातल्या आहेत. कोरोना महामारी थैमान घालत असताना जपानमध्ये जूलै महिन्यात ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित आहे. त्यातच जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट आली असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जापनिज लोक या ऑलिम्पिक स्पर्धांना विरोध करताना दिसत आहे. तसेच ऑलिम्पिक सुपरस्प्रेडर इव्हेंट ठरु शकतो, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. 

जपानमध्ये २३ जूलैपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना अनेकांनी या स्पर्धेबाबत चिंता व्यक्त केलीये. स्पर्धेसाठी इतर देशातील प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. असे असले तरी 60 हजारांपेक्षा अधिक स्पर्धक, कोच, स्टाफ, पत्रकार आणि इतर आवश्यक कर्मचारी जवळपास २०० देशांतून जपानमध्ये येऊन धडकणार आहेत. प्रत्येक देशामध्ये विषाणूचा विभिन्न प्रकार, लसीकरण मोहीम वेगवेगळ्या पातळीवर सुरु आहे. त्यामुळे ही स्पर्धा कोरोना महामारी भीषण रुप घेण्याचं कारण ठरु शकते, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

स्पर्धेसाठी जगभरातून जपानमध्ये घेणारे लोक पाहता हा कार्यक्रम धोकादायक आहे. ऑलिम्पिक संपल्यानंतर स्पर्धक आणि स्टाफ जेव्हा घरी परतेल तेव्हा तो सुपरस्रेडर इव्हेंट ठरु शकतो, असं मत टेक्सास विद्यापीठातील स्पेन्सर फॉक्स यांनी व्यक्त केलं आहे. स्पर्धेसाठी आपण सर्व प्रकारची काळजी घेऊ शकतो, पण संसर्गाचा धोका आपण टाळू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत. जपानने सर्व स्पर्धकांना लस दिली जाणार असल्याचं म्हटलं आहे, पण यामुळे तज्त्रांचं समाधान झालेलं नाही. ऑलिम्पिक स्पर्धा ही केवळ जपानसाठी नाही, तर अख्या जगासाठी डोकेदुखी वाढवणारी घटना ठरु शकते. त्यामुळे जपानमधील अनेक नागरिक आणि अनेक तज्ज्ञ ही स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.   दरम्यान, जपानमध्ये आतापर्यंत ४ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोना झाला आहे, तर ९ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. 

जपान सरकार टोकिओ ऑलिम्पिक घेण्यासाठी उतावीळ असले तरी स्थानिक नेत्यांनी सरकारला धोक्याचा इशारा दिला आहे. अनेक प्रांतमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत मार्च २२ ते मार्च २८ च्या दरम्यान कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट आल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला असताना जपानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. पण, ऑक्टोंबर-डिसेंबरमध्ये यात मोठी वाढ झाली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT