France 
ग्लोबल

Right to Abortion in France: फ्रान्समध्ये गर्भपात हा घटनात्मक अधिकार; ठरला जगातील पहिला देश

France makes abortion a constitutional right: फ्रान्स सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गर्भपात करणे हा महिलांचा मूलभूत अधिकार ठरवण्यात आला आहे. फ्रान्सच्या संविधानात असा उल्लेख करण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

पॅरिस- फ्रान्स सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गर्भपात करणे हा महिलांचा मूलभूत अधिकार ठरवण्यात आला आहे. फ्रान्सच्या संविधानात असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे असं करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे. (France makes abortion a constitutional right becomes first country to do so)

विशेष म्हणजे फ्रान्सच्या संसदेमध्ये या घटनात्मक तरतुदीला मोठ्या संखेने पाठिंबा मिळाला. संसदेच्या संयुक्त मतदानात खासदार आणि सिनेटर यांनी ७८० विरुद्ध ७२ अशा फरकाने या दुरुस्तीच्या बाजूने कौल दिला. फ्रान्समध्ये महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गटाने याचे स्वागत करत जल्लोष केलाय. तर, गर्भपाताला विरोध करणाऱ्या गटाने कडाडून टीका केली आहे.

फ्रान्समध्ये ८० टक्के जनतेचा पाठिंबा

फ्रान्समधील गर्भपाताला पाठिंबा देणाऱ्या महिला कार्यकर्त्या सेंट्रल पॅरिस येथे जमा झाल्या होत्या. यावेळी त्यांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या हातामध्ये 'माय बॉडी माय चॉईस' (माझे शरीर, माझी निवड) असे लिहिलेले पोस्टर दिसत होते. अमेरिकेपेक्षा फ्रान्समध्ये गर्भपाताला अधिक मान्यता आहे. सार्वमतावेळी या निर्णयाच्या बाजूने ८० टक्के लोकांनी पाठिंबा दिला होता. यावरुन लोकांचा कल लक्षात येईल.

अनेक देशांमध्ये गर्भपाताला परवानगी नाही. दुर्मिळ किंवा अपवादात्मक परिस्थितीत संबंधितांकडून गर्भपाताला परवानगी दिली जाते. पण, फ्रान्समध्ये गर्भपाताला कायदेशीर ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे महिला आता आपल्या इच्छेनुसार गर्भपात करु शकणार आहेत. असा निर्णय घेणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. फ्रान्स सरकारच्या निर्णयाला इतर देश पथदर्शी म्हणून पाहतील अशी आशा आहे.

गर्भपात मूलभूत अधिकार

फ्रान्सचे पंतप्रधान अटेल यांनी मतदानावेळी कायदेमंडळात सांगितलं की, आम्हाला महिलांना संदेश द्यायचाय की, हे शरीर तुमचं आहे आणि त्याच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी तुमचा असेल. दरम्यान, अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये गर्भपात हा बेकायदा आहे. सध्या तेथे या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे.

फ्रान्समध्ये १९७४ पासून गर्भपात हे कायदेशीर आहे. पण, अमेरिकेमध्ये २०२२ मध्ये एका निर्णयात गर्भपाताचा अधिकार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये गर्भपाताला मूलभूत अधिकार करण्यासाठी चळवळ सुरु झाली. त्यानंतर सोमवारी कलम ३४ मध्ये दुरुस्ती करुन गर्भपात हा मूलभूत अधिकार करण्यात आलाय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Leopard: शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या पुन्हा-पुन्हा का येतो? माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

Latest Marathi News Live Update : वाहन चालकाला डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर अपघात, महिला जखमी

Shashikant Shinde : पक्षाचे हित महत्त्वाचे; सन्मानजनक प्रस्तावासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय होईल- शशिकांत शिंदे!

Pune Police Rescue : बाणेरमधील लॉजवर पोलिसांची धडक; महिलांची सुटका; व्यवस्थापकासह चार आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT