Israel Hamas War eSakal
ग्लोबल

Israel Hamas War : "शस्त्रसंधी करण्यात इस्राईलचे हित", इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे प्रतिपादन; नेतान्याहूंनी झुगारला जागतिक दबाव

या हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे केवळ आक्रोश निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

हमासच्या दहशतवाद्यांबरोबरील लढाईत इस्राईलचे सैन्य गाझातील दाट शहरी भागात घुसून कारवाई करीत असल्याने हजारो पॅलेस्टिनी उत्तर गाझामधून पळून जात आहेत. गाझामधील मृतांची संख्‍या वाढत असल्याने इस्राईलने शस्त्रसंधी करावी, असे आवाहन फ्रान्सचे अध्यक्ष इम्यानुएल मॅक्रॉन यांनी केले. पण तरीही इस्राईलने हल्ले आणखी तीव्र केले.

‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन म्हणाले, ‘‘सर्वांचा जीव महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन ही शस्त्रसंधी इस्राईलला स्वतःच्या संरक्षणासाठी मध्यम व दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरेल. लोकशाहीवादी असल्याने आपल्या तत्त्वांमुळे ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे.’’ ‘‘इस्राईलने स्वसंरक्षणासाठी गाझावर मोठ्या प्रमाणात बाँब हल्ले करणे हा सर्वोत्तम मार्ग असू शकत नाही. इस्राईलने गाझातील नागरिकांवर बाँब हल्ले करण्याचे कोणतेही औचित्य नव्हते.

या हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे केवळ आक्रोश निर्माण झाला आहे. यामध्ये बालके, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला आहे,’’ असेही ते म्हणाले. एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या या युद्धात गाझामधील ११ हजार पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत, असे गाझातील अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्राईलमध्येही १४ हजार नागरिक ठार झाले आहे.

हानीची जबाबदारी हमासची

शस्त्रसंधीसाठी जगभरातून आणला जाणारा दबाव इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी झुगारून लावला आहे. ते म्हणाले, की हमासबरोबर शस्त्रसंधी करणे म्हणजे आत्मसमर्पण करणे आहे. नागरिकांच्या कोणत्याही हानीची जबाबदारी इस्राईलची नसून हमासची आहे. पॅलेस्टिनी भूभाग पुन्हा ताब्यात घेण्याची इस्राईलची कोणतीही योजना नाही, तर त्यांना एक चांगला भविष्यकाळ आम्ही देऊ इच्छितो, यावर त्यांनी भर दिला.

रीब आणि कोंडीत अडकलेल्या य प्रदेशात निःशस्त्रीकरण, कट्टरतावादाचे निर्मूलन करून पुनर्बांधणी करणे आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले. इस्राईलने केलेल्या बाँबहल्ल्यांमुळे गाझातील ३६ पैकी २० रुग्णालयांमधील काम बंद पडले आहे. यामध्ये बालरोग रुग्णालयाचाही समावेश आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) शुक्रवारी (ता.१०) म्हटले आहे. इस्रायली सैनिकांनी काल रात्री गाझा शहरातील मुख्य रुग्णालयाच्या परिसरात हल्ला केल्याचा दावा पॅलेस्टिनी नागरिकांनी केला आहे तर पॅलेस्टाईनने डागलेल्या रॉकेटचा हल्ला चुकून रुग्णालयानजीक झाल्याचे इस्राईलने म्हटले आहे.

हमासने ७ ऑक्टोबरला इस्राईलवर केलेल्या हल्ल्यापासून आतापर्यंत गाझातील रुग्णालये, दवाखाने, रुग्ण आणि रुग्णवाहिकांवर अडीचशेहून अधिक हल्ले झाले असून इस्राईलमधील आरोग्य सेवेवर २५ हल्ले झाल्याचे ‘डब्लूएचओ’ने पडताळणीत म्हटले आहे. ‘‘गाझातील आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर असून तेथील परिस्थितीचे वर्णन करणे अशक्य आहे, असे ‘डब्लूएचओ’चे सरचिटणीस डॉ. टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसूस म्हणाले.

युद्धाचा परिणाम

  • अन्नटंचाई, निर्वासितांच्या छावण्यांमधील खिन्न वातावरणाने गाझामधील जीवनमान पूर्णपणे उद्‍ध्वस्त हाेण्याचा धोका.

  • इस्राईल-हमास युद्धावरील संघर्षामुळे अमेरिकेतील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षेची भावन.

  • इस्राईलमधील ज्यू निर्वासितांना हंगेरीमधील ग्रामीण भागातील छावण्यांमध्ये चांगली वागणूक.

मुस्लिम देशांची बैठक

गाझामध्ये इस्राईलकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात मुस्लिम देशांची एकजूट होत आहे. गाझातील युद्धासंदर्भात इस्लामिक सहकार्य संघटनेची (ओआयसी) आज सौदी अरेबियामधील रियाध येथे बैठक झाली. यात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी हेही सहभागी झाले होते.

‘गाझा म्हणजे पृथ्वीवरील नरक’

‘‘आज जर पृथ्वीवर नरक असेल तर त्याचे नाव उत्तर गाझा आहे,’’ असे भाष्य संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मानवतावादी संघटनेचे प्रवक्ते जेन्स लायर्की यांनी हमास-इस्राईल युद्धाबाबत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT