France Gift to Indian Students eSakal
ग्लोबल

France Gift to India : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्सचं मोठं गिफ्ट; राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी केली घोषणा!

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

Sudesh

France Gift to Indian Students : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. यानिमित्ताने त्यांनी फ्रान्समध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली. 2030 सालापर्यंत फ्रान्समध्ये 30 हजार भारतीय विद्यार्थी असतील यादृष्टीने एक योजना आखल्याचं त्यांनी जाहीर केलं.

फ्रेंच शिकण्यासाठी लर्निंग सेंटर्स

पब्लिक स्कूलमध्ये फ्रेंच भाषा शिकता यावी यासाठी "फ्रेंच टू ऑल, फ्रेंच फॉर अ बेटर फ्युचर" या अभियानाअंतर्गत मोहीम राबवण्यात येईल. जास्तीत जास्त फ्रेंच लर्निंग सेंटर्स उभारण्यासाठी एक नेटवर्क तयार केलं जात असल्याची माहिती देखील इमॅन्युएल यांनी दिली.

इतर विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय

फ्रान्समध्ये शिक्षण घ्यायचं आहे, मात्र फ्रेंच येत नाही अशा विद्यार्थ्यांनाही तिथे जाता येणार आहे. यासाठी फ्रान्स सरकार आपल्या विद्यापीठांमध्ये विशेष 'इंटरनॅशनल क्लासेस' सुरू करण्यात येणार आहेत, असं इमॅन्युएल यांनी स्पष्ट केलं.

व्हिसा प्रक्रिया होणार सोपी

फ्रान्समध्ये यापूर्वी शिक्षण घेतलेल्या कोणत्याही माजी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचंही इमॅन्युएल यांनी सांगितलं.

भारत आणि फ्रान्सला एकत्रित पुढे जायचं आहे. दोन्ही देशांमधील तरुणांच्या मदतीनेच हे शक्य होणार आहे. समन्वय, विश्वास आणि मैत्रीच्या माध्यमातून आपण हे करु शकतो, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम येणार - भरणे

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT