France Riots  eSakal
ग्लोबल

France Riots : 'हिंसाचाराला व्हिडिओ गेम्स जबाबदार, पालकांनी मुलांना घरात ठेवावं'; फ्रान्सच्या अध्यक्षांचं विधान

देशातील कित्येक ठिकाणी पोलिसांविरोधात हिंसक आंदोलनं सुरू आहेत.

Sudesh

फ्रान्समध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दंगली सुरू आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने झाडलेल्या गोळीमुळे एका मुलाचा मृत्यू झाला होता. यानंतर मोठ्या प्रमाणात किशोरवयीन मुलं फ्रान्सच्या रस्त्यांवर उतरली आहेत. देशातील कित्येक ठिकाणी पोलिसांविरोधात हिंसक आंदोलनं सुरू आहेत. (France Riots)

या दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी या सगळ्याला व्हिडिओ गेम्स जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. रस्त्यावर उतरलेले तरुण-तरुणी हे व्हिडिओ गेममधील हिंसेचं अनुकरण करत आहेत. या गेम्सची नशा मुलांना बिघडवत आहे, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं असं मॅक्रॉन म्हणाले.

मुलांना सांभाळणं सरकारचं काम नाही

मॅक्रॉन यावेळी म्हणाले, की "देशात सुरू असलेल्या हिंसाचारात अगदी लहान वयातील मुलं सहभागी आहेत. या मुलांना घरात ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. हे सरकारचं काम नाही." एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सोशल मीडियाला आवाहन

यावेळी मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया कंपन्यांनाही आवाहन केलं आहे. दंगलींसंबंधित अतिसंवेदनशील माहिती हटवण्याची विनंती त्यांनी स्नॅपचॅट आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना केली. या दंगली वाढण्यात सोशल मीडियाचा मोठा हात असल्याचंही ते म्हणाले.

फ्रान्समध्ये होत असलेल्या या दंगलींचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात १४ ते १५ वर्षांच्या मुलांचा सहभाग आहे. गेल्या चार दिवसांपासून फ्रान्समध्ये या दंगली सुरू आहेत. लहान मुलांचा अधिक सहभाग असल्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर बंधने येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT