Lucile Randon sakal
ग्लोबल

केन तनाका यांच्या मृत्युनंतर ल्युसिल रेंडन ठरल्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती

ल्युसिल रेंडन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये झाला.

सकाळ डिजिटल टीम

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जपानच्या केन तनाका (Kane Tanaka) यांचे वयाच्या 119 व्या वर्षी १९ एप्रिलला निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आता फ्रान्सच्या (France) ल्युसिल रेंडन (Lucile Randon) जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती (Oldest Known Person) बनल्या आहेत. त्यांचे वय 118 वर्षे 73 दिवस आहे. 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये त्यांचा जन्म झाला. सिस्टर आंद्रे या नावाने त्यांना ओळखल्या जाते. (frances lucile randon became the worlds oldest person after the death of kane tanaka)

केन तनाका यांचे 19 एप्रिल 2022 रोजी निधन झाले. त्यानंतर सिस्टर आंद्रे सर्वात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. त्याच्यानंतर पोलिश महिलेचा क्रमांक लागतो, ज्यांचे वय 115 वर्षे आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा किताब मिळाल्याने आंद्रे यांना खूप आनंद झाला आहे. सध्या त्यांना डोळ्यानी कमी दिसते.

आंद्रे यांना जीन क्लेमेंटचा विक्रम मोडायचा आहे. जीन कॅलमेंट या फ्रान्सच्या रहिवासी होत्या, ज्या 1997 मध्ये मरण पावल्या. त्यांचे वय 122 वर्षे असल्याचे सांगितले जाते.

कोण होत्या केन तनाका ?

जपानमधील (Japan) केन तनाका (Kane Tanaka) या जगातील सर्वात वृद्ध महिलाचे आज निधन झाले आहे. त्यांची जगातील सर्वात वृद्ध महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकोर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली होती. 2 जानेवारी 2022 रोजी केन तनाका यांचा 119 वा वाढदिवस होता. केन तनाका यांचा जन्म 2 जानेवारी 1903 मध्ये झाला. त्यांच्या आईवडीलांना सात मुलं होती. त्यापैकी केन तनाका या सातव्या महिला होत्या. 19 व्या वर्षी केन तनाका यांचे लग्न हिडियो तनाका यांच्यासोबत झाले. हिडियो आणि केन तनाका यांना पाच मुलं आहेत.

जपानमध्ये जगातील सर्वात वृद्ध लोकसंख्या आहे. जपानमध्ये सुमारे 28 टक्के लोकसंख्या 65 किंवा त्याहून अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT