French Prime Minister Macron is likely to attend the Republic Day as the chief guest 
ग्लोबल

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ठरले, मोदींचे स्वीकारले निमंत्रण

गतवेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांनी उपस्थिती दर्शविली होती.

सकाळ वृत्तसेवा

Republic Day 2024

नवी दिल्ली: येत्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे पंतप्रधान इम्यॅन्यूएल मॅक्रॉन उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मॅक्रॉन यांना निमंत्रण पाठविण्यात आले असल्याची माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली.

मॅक्रॉन हजर राहिले तर ते या कार्यक्रमास हजर राहणारे सहावे फ्रान्सचे सहावे वरिष्ठ नेते ठरतील. माजी पंतप्रधान जॅक शिराक यांनी १९७६ आणि १९९८ असे दोनवेळा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास हजेरी लावली होती. केंद्र सरकारने याआधी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना निमंत्रण पाठविले होते. (Latest Marathi News)

मात्र जानेवारी महिन्यात दिल्लीला येऊ शकत नाही, असे त्यांनी कळविले होते. या पार्श्वभूमीवर सरकारकडून मॅक्रॉन यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस ‘बॅस्टिल डे ला हजेरी लावली होती.

गतवेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांनी उपस्थिती दर्शविली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT