friendship between India and Nepal is like the Himalayas pm narendra modi
friendship between India and Nepal is like the Himalayas pm narendra modi sakal
ग्लोबल

मोदींचा दौरा : दृढतेतून मानवतेला लाभ; नेपाळशी मैत्री हिमालयासारखी

सकाळ वृत्तसेवा

लुंबिनी : भारत आणि नेपाळमधील मैत्री ही हिमालयासारखीच अभेद्य असून सध्याच्या जगातिक स्थितीत आमच्या दृढ संबंधांचा फायदा सर्व मानवतेला होऊ शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. नेपाळबरोबरील संबंध दृढ होत असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. बुद्धपौर्णिमेनिमित्त नेपाळ दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी भगवान गौतम बुद्धांचे जन्मठिकाण असलेल्या लुंबिनी शहराला भेट देत जन्मस्थानाचे दर्शन घेतले. त्यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्यासह २५६६ व्या बुद्धजयंतीच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला. यावेळी आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेतही त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी त्यांनी भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीचे महत्त्व स्पष्ट केले. मोदी म्हणाले,‘‘सध्याच्या परिस्थितीत भारत आणि नेपाळमधील दृढ होत चाललेल्या संबंधांचा सर्व मानवतेला फायदा होणार आहे. नेपाळबरोबरील मैत्री हिमालयासारखी अभेद्य आहे. बुद्धांच्या विचारांच्या साह्याने जगासमोरील प्रश्‍नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. बुद्ध हे मानवतेचे प्रतिक आहेत.’’

मोदी यांनी २०१४ च्या दौऱ्यात नेपाळला भेट दिलेल्या महाबोधी वृक्षाच्या रोपट्याची वाढ झाल्याचे पाहून त्यांनी आनंदही व्यक्त केला. एका दिवसाच्या दौऱ्यानंतर मोदी संध्याकाळी भारतात परतले. मोदी व शेरबहादूर देऊबा यांच्या हस्ते आज लुंबिनी येथे बौद्ध सांस्कृतिक आणि वारसा जपण्यासाठी इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे भूमिपूजन केले.

राममंदिराबद्दल नेपाळी जनतेतही आनंद

पंतप्रधान मोदींनी यावेळी राममंदिराचाही उल्लेख केला. ‘जनकपूर येथे गेलो असताना, नेपाळशिवाय आमचे प्रभू श्रीराम अपूर्ण आहेत, असे मी म्हणालो होतो. आज भारतात भव्य राममंदिर उभारले जात आहेत, यामुळे भारतीयांइतकाच नेपाळी जनतेलाही आनंद होत आहे,’ असे मोदी म्हणाले.

विश्‍वशांतीसाठी प्रार्थना

पंतप्रधान मोदी यांनी दौऱ्याची सुरुवात लुंबिनी येथील मायादेवी मंदिराला भेट देत केली. येथेच भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. मोदींनी येथे पूजा-अर्चना करत विश्‍वशांतीसाठी भगवान बुद्धांकडे प्रार्थना केली. सम्राट अशोकाने इ. स. पू. २४९ मध्ये या मंदिरात उभारलेल्या ‘अशोक स्तंभा’जवळ त्यांनी दीपप्रज्वलनही केले.

सहा करारांवर सह्या

पंतप्रधान मोदी व नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांत सहकार्याबाबत करार झाले. लुंबिनी बौद्ध विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन सुरु करणे, काठमांडू विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास यांच्यात सहकार्य या करारांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT