Sudan Childrens sakal
ग्लोबल

Sudan Childrens : अंतर्गत यादवीमुळे सुदानी बालकांचे भवितव्य धोक्यात

अंतर्गत यादवीमुळे मोडकळीस आलेल्या सुदानमध्ये लहान मुलांवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार प्रचंड प्रमाणात होत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे.

पीटीआय

न्यूयॉर्क - अंतर्गत यादवीमुळे मोडकळीस आलेल्या सुदानमध्ये लहान मुलांवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार प्रचंड प्रमाणात होत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. कांगो आणि हैती या देशांमध्येही बालकांचे आणि युवकांचे भवितव्य अंधारात असल्याचे ‘यूएन’च्या राजदूत व्हर्जिनिया गांबा यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करताना सांगितले.

विविध देशांमधील संघर्षस्थितीमुळे लहान मुले आणि युवकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून त्यांना शारीरिक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. अनेक जणांचे शिक्षणही थांबले असल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे गांबा यांनी सांगितले. सुदान, कांगो, हैती या देशांबरोबरच त्यांनी म्यानमार, सोमालिया आणि अफगाणिस्तान या देशांमधील बालकांबाबतही चिंता व्यक्त केली आहे.

बालहक्कांचा भंग होत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी यंदा प्रथमच इस्राईल आणि इस्लामिक जिहाद या पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटनेला काळ्या यादीत टाकले आहे. गाझा पट्टीतील संघर्षात बालकांच्या हक्कांचा भंग होऊन त्यांच्या भविष्याची अपरिमित हानी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या काळ्या यादीत रशियाचाही समावेश आहे.

सुदानमधील लष्कर आणि निमलष्कर यांच्यात मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून सत्तासंघर्ष सुरू आहे. दार्फुर आणि चड भागात संघर्षाचे प्रमाण अधिक आहे. या संघर्षात आतापर्यंत १४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ३३ हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांमधील सैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर हत्या, बलात्कार, लैंगिक अत्याचार केले जात असून याला लहान मुलेही बळी पडत असल्याचे अहवालात म्हटले आहे. शाळा आणि रुग्णालयांवरही सर्रास हल्ले होत आहेत.

भविष्यातील अंधार

  • कांगो देशात शांतिसैन्य माघारी बोलाविले जात असल्याने बंडखोरांनी डोके वर काढले आहे. येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

  • हैती देशात तीन वर्षांपासून माफिया टोळ्यांचा प्रभाव वाढला आहे. त्यांच्या संघर्षात देशाच्या अध्यक्षांचाही बळी गेला आहे. खून, बलात्कार, अपहरण यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

  • म्यानमारमध्ये लष्करी सत्तेला कंटाळून हजारो रोहिंग्या मुस्लिम स्थलांतर करत असल्याने त्यांच्यातील बालकांचे हाल होत आहेत

  • अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणावर आणि नोकरी करण्यावरच बंदी आहे.

  • सोमालियात दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढला असून हिंसाचार बळावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT