ग्लोबल

आता नोकरी होणार फक्त चार तासांची!

पीटीआय

शांघाय : "भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेणार नाही, तर ती त्यांना मदतच करेल, या कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून लोकांना आठवड्यातून केवळ बारा तास म्हणजे रोज केवळ चार तासच काम करावे लागेल. हे सगळे तंत्रज्ञान आणि शिक्षणातील क्षेत्रातील आधुनिक बदलांच्या माध्यमातून होऊ शकेल, असे मत अलिबाबाचे संस्थापक आणि चीनमधील कडवट श्रमसंस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या जॅक मा यांनी मांडले आहे.

'वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स'मध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्कदेखील सहभागी झाले होते. जॅक मा यांनी या वेळी विद्युत क्षेत्रातील स्थित्यंतराचे उदाहरण दिले. "विद्युत शक्तीच्या वापरामुळे आज लोकांच्या हाती बराचसा मोकळा वेळ शिल्लक असून तो तुम्ही सायंकाळची डान्स अथवा म्युझिक पार्टीमध्ये व्यतीत करू शकता. यामुळे लोकांना अधिकाधिक आनंदाचा उपभोग घेता येईल,'' असेही त्यांनी नमूद केले.

पुढील दहा ते वीस वर्षांमध्ये व्यक्ती, देश आणि सरकार यांना शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपल्या मुलांना आठवड्यातून केवळ तीनच दिवस काम करावे लागेल, अशा नोकऱ्या मिळाव्यात म्हणून खबरदारी घ्यावी लागेल. आपण यासाठी शिक्षणक्षेत्रामध्ये बदल घडवून आणले नाही तर संकटात सापडू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

SCROLL FOR NEXT