G-7 Conference sakal
ग्लोबल

G-7 Conference : नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू यांच्याशी ‘जी-७’ परिषदेमध्ये साधला संवाद

‘जी-७’च्या मंचावर नेत्यांच्या गाठीभेटी

पीटीआय

बारी (इटली) - खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येशी संबंधित प्रकरणावरून गेल्या वर्षी भारत-कॅनडा संबंधांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू यांच्याशी ‘जी-७’ परिषदेमध्ये संवाद साधला. या दोन्ही देशांच्या नेत्यांची अचानक झालेली भेट चर्चेचा विषय बनली आहे.

विकसित देशांच्या ‘जी-७’ परिषदेसाठी इटलीत आलेल्या मोदी यांनी शुक्रवारी (ता.१४) ट्रुडू यांच्याबरोबरच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याशीही चर्चा केली. मोदी यांनी या नेत्यांच्या भेटीची छायाचित्रे ‘एक्स’ या सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

दृढ संबंधांचा विश्‍वास

परिषदेच्या निवेदनात सात औद्योगिक देशांनी भारत-पश्‍चिम आशिया व युरोप आर्थिक कॉरिडॉरसारखे मूलभूत सुविधा उभारणीस प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले अल्जेरिया, ब्राझील, भारत, जॉर्डन, केनिया, मॉरिटानिया, ट्युनिशिया, तुर्किये आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांच्या सहभागाचे स्वागत करतो, असे त्यात म्हटले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्य सागर या विषयांवर परिसंवादाची संदर्भही निवेदनात दिला आहे. या परिसंवादात मोदींनी भाग घेतला होता. ‘जी-७’ कार्यक्रमपत्रिकेव्यक्तीरिक्त रशिया संघर्षात युक्रेनला पाठिंबा देण्याचा उल्लेख निवेदनात केला.

‘बायडेन यांची भेट आनंददायी’

न्यूयॉर्कमधील शीख फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येच्या कटाच्या प्रयत्नात भारताचा संबंध असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या आरोपानंतर प्रथमच मोदी व बायडेन यांची भेट झाली. मोदी यांनी म्हटले आहे, ‘‘अध्यक्ष बायडेन यांना भेटणे, हे नेहमीच आनंददायी असते. जगाच्या कल्याणासाठी भारत व अमेरिका एकत्र काम करीत राहतील.’’

नरेंद्र मोदी- जस्टिन ट्रुडू भेट

ट्रुडू यांच्या भेटीचे छायाचित्र मोदी यांनी ‘एक्स’वर प्रसिद्ध केले आहे. त्याबरोबरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ट्रुडू यांची भेट झाली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांच्याबरोबर फलदायी चर्चा झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. किशिदा यांच्याशी मोदी यांनी चर्चा केली.

अन्य नेत्यांशीही चर्चा

तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैय्यब एर्दोगान, ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महंमद बिन झायेद अल नाहयान यांच्याबरोबरही चर्चा केली. या तिन्ही नेत्यांशी चांगली चर्चा झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले. जॉर्डनचे शाह अब्दुल्ला द्वितीय यांच्या चर्चेबद्दल माहिती देताना ‘जॉर्डनबरोबर मजबूत संबंध निर्माण करण्यास भारत महत्त्व देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT