Gaëtan Dugas 
ग्लोबल

'या' व्यक्तीमुळे जगभरात पसरला एड्स, संशोधकांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

वर्ल्ड एड्स डे (World Aids Day 2021) म्हणजेच जागतिक एड्स दरवर्षी 1 डिसेंबरला साजरा केला जातो. या दिवसाची सुरूवात 1988मध्ये झाली होती. लोकांना या आजाराबाबत जागरुक करणे हा त्यामागील मुख्य हेतू होता. एड्स या आजारावर उपचार शक्य नाही पण त्यावर नियंत्रण केले जाऊ शकते त्यासाठी थोडी सावधगिरी बाळगावी लागते. काही वर्षांपासून सुरु असलेल्या जागरुकता अभियानानंतर आता कुठे लोकांच्या मनातून या आजाराविषयीचे गैरसमज दूर झाले आहे. पण काही अशा गोष्टी आहे ज्या लोकांना अजूनही माहित नाही.

HIV एड्स बाबत कित्येक गोष्टी आहे ज्याची माहिती अद्याप लोकांना नाही. हा धोकादायक आजार जगभरात कसा पसरला?याबाबत खूप कमी लोकांना माहित आहे.

अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार HIV सारखा विषाणू चिम्पांजीमध्येही आढळून आला ज्याला SIV म्हणून ओळखले जाते. एचआयव्हीचा विषाणू चिम्पांजीमधून मानवी शरीरामध्ये पसरला. याबाबत संशोधकांनी माडलेल्या वेगवेगळ्या थेअरींपैकी चिम्पाजी आणि शिकारीची थिअरी प्रचलित आहे. हा व्हायरस अफ्रिकेतील कांगो(African Jungle) जंगलमध्ये राहणाऱ्या एका चिम्पांजीच्या शरीरामध्ये होता. 1920मध्ये एका शिकारीने त्याला जखमी केले. चिम्पांजीचे शरीरतील रक्त आणि शिकारीच्या शरीरासोबत एकत्र झाले आणि अशाप्रकारे व्हायरस माणसाच्या शरीरामध्ये HIV विषाणूने प्रवेश केला.

आता जाणून घेऊ, या त्या व्यक्तीबाबत ज्या HIV चा पहिला रुग्ण म्हटले जाते. त्याचे नाव आहे गॅटन दुगास. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशन्स (centar For Disesase And Prevention) च्या रिपोर्टनुसार एड्स पसरविण्यामागे हा व्यक्ती कारणीभूत आहे. गॅटन कॅनेडियन फ्लाईट अटेंडेंट होता. गॅटन हा गे(Gay) होता. गॅटनला एड्स आहे आणि त्याच्यावर काही उपचार नाही हे माहित असतानाही त्यांनी काही पुरुषांसह संबध ठेवले आणि या आजाराचा अधिक प्रसार केला.

लोक कधीकधी म्हणतात की HIV ची सुरुवात 1980 च्या दशकात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) मध्ये झाली होती, परंतु खरं तर हे तेव्हाच होते जेव्हा लोकांना पहिल्यांदा HIV ची जाणीव झाली आणि ती अधिकृतपणे नवीन आरोग्य स्थिती म्हणून ओळखली गेली.

सुरवातीच्या काही वर्षांमध्ये पुरुषांमध्ये हा आजार पाहायला मिळाला

अमेरिकेमध्ये या आजाराच्याबाबत जेव्हा समजले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. हा आजार जेव्हा पाहिल्यांदा समोर आला तेव्हा पुढील 8 वर्षामध्ये एचआईव्हीमुळे संक्रमित लोकांमध्ये 92 टक्के पुरुष पॉझिटिव्ह होते. मात्र 8 टक्के महिलाही या आजाराने ग्रस्त होत्या. हळू हळू या संख्येमध्ये वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत घर नाही सांगून बंगला न सोडणाऱ्या मुंडेंचा चौपाटीवर आलिशान फ्लॅट, खरेदी केल्यापासून बंदच, कोट्यवधी रुपये किंमत

Panchang 13 August 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे

Solapur News:'५० हजार बहिणी पाठविणार देवाभाऊंना राख्या'; स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी महिला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न

Latest Marathi News Updates : माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ED चे समन्स; बेटिंग अ‍ॅप प्रकरणी आज होणार चौकशी

Zilla Parishad : गट, गण प्रारूप रचनेवर सुनावणी पूर्ण; विभागीय आयुक्तांकडून ११५ सूचना व हरकती मान्य; ८८ फेटाळल्या

SCROLL FOR NEXT