ग्लोबल

Gaza Declares War : राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यांनी इस्राईलमध्ये केली आणीबाणीची घोषणा; आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू

संतोष कानडे

नवी दिल्लीः इस्राईलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने शनिवारी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. हमास आणि इस्लामिक जिहादने आतापर्यंत किमान 22 नागरिकांना ठार केले आहे.

या हल्ल्यामध्ये 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात गाझामधून इस्राईलमध्ये घुसखोरी करुन देशाच्या दक्षिणेकडील आणि मध्य प्रदेशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलेले आहे.

इस्त्राईलमध्ये परिस्थिती स्फोटक बनली आहे. शनिवारी सकाळी ४ वाजल्यापासून गाझा पट्ट्यातून हमास दहशतवादी संघटना इस्त्रायलच्या प्रदेशावर हल्ला करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्त्राईल हादरला असून स्टॅट ऑफ वॉरची घोषणा करण्यात आली आहे.

इस्राईलने गाझा पट्टीमध्ये एअर स्ट्राईक करण्यास सुरुवात केली आहे. इस्राईलच्या एअर फोर्सने देखील एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. याठिकाणी असणाऱ्या हमास दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

SCROLL FOR NEXT