Irmgard Furchner Esakal
ग्लोबल

German war criminals: 99 वर्षांच्या महिलेला तुरुंगातून सोडण्यास कोर्टाने का दिला नकार? थेट होता हिटलरने केलेल्या हत्यांशी संबंध

German war criminals: इर्मगार्ड फर्शनर असे या महिलेचे नाव असून ती नाझी सैन्यातील एका अधिकाऱ्याची सचिव म्हणून स्टथॉफ येथील (सध्या पोलंडमध्ये) छळछावणीत काम करत होती.

आशुतोष मसगौंडे

बर्लिन, ता. २० (पीटीआय) : जर्मनीतील न्यायालयाने ९९ वर्षांच्या एका कैदी महिलेने तुरुंगातून सोडून देण्याची विनंती करणारी केलेली याचिका फेटाळून लावली आहे. दुसऱ्या महायुद्ध काळात सुमारे १० हजार जणांच्या हत्येला नाझी सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सचिव म्हणून ती कारणीभूत असल्याचे ठरवून तिला शिक्षा झालेली आहे. (German war criminals)

इर्मगार्ड फर्शनर असे या महिलेचे नाव असून ती नाझी सैन्यातील एका अधिकाऱ्याची सचिव म्हणून स्टथॉफ येथील (सध्या पोलंडमध्ये) छळछावणीत काम करत होती. या छावणीत १०,५०५ जणांना ठार मारण्यात आले होते. या हत्याकांडातील एक भागीदार म्हणून फर्शनर यांना दोषी ठरवून शिक्षा झालेली आहे.

मागील महिन्यात त्यांनी याचिका करत शिक्षेतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्याकाळात फर्शनर यांच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार झालेल्या हत्याकांडात त्या खरोखरच किती साह्यकारी ठरल्या आणि त्यांना छळछावणीत घडणाऱ्या प्रकारांची तरी त्यांना माहिती होती का, याबाबत शंका आहेत, असा युक्तिवाद त्यांच्या वकीलांनी केला होता.

मात्र, जून १९४३ ते एप्रिल १९४५ या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांची सचिव आणि स्टेनोग्राफर म्हणून काम करत असलेल्या फर्शनर यांना छळछावणीत डांबलेल्या कैद्यांना गॅसचेंबरमध्ये घालून निघृणपणे मारले जात असल्याची पूर्ण कल्पना होती, असे न्यायालयाने स्पष्ट करत याचिका फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT