afganistan sakal
ग्लोबल

जर्मनीने थांबवली अफगाणिस्तानची विकास मदत!

जर्मनीच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अनेक देशांनी काळजी व्यक्त केली आहे. दरम्यान, जर्मनीनं अफगाणिस्तानला पाठवण्यात येणारी विकास मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

यावर बोलताना जर्मनीचे विकास मंत्री गेर्ड म्यूलर म्हणाले, "अफगाणिस्तानला विकासासाठी देण्यात येणारा निधी बंद करण्यात आला आहे. आम्ही त्या स्थानिक विकास अधिकाऱ्यांना आणि एनजीओ कार्यकर्त्यांना अफगाणिस्तानच्या बाहेर काढण्याचं काम वेगानं करत आहोत. या लोकांना लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचं आहे.

तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तान देशाचा ताबा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकने मोठा निर्णय घेतला आहे. फेसबुकने तालिबानच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. फेसबुकने म्हटलंय की, अमेरिकेच्या कायद्याअंतर्गत तालिबान एक दहशतवादी संघटना आहे आणि आम्ही आमच्या Dangerous Organisation Policies अंतर्गत त्यांच्यावर बंदी घातली आहे. दुसरीकडे ट्विटरनेही आपली भूमिका जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT