काबुल : अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी शक्तिशाली बॉम्स्फोट घडविण्यात आले. हा बॉम्बस्फोट परवान शहरामध्ये सकाळी झाला. या बॉम्बस्फोटात राष्ट्रपती अशरफ गनी हे बालंबाल बचावले. मात्र, यामध्ये 24 जण ठार झाले तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत.
राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या निवडणूक रॅलीवर पहिला बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये 24 जण ठार झाले. याबाबतची माहिती टोलो न्यूजने दिली आहे. हा हल्ला सकाळी झाला. या हल्ल्यातून राष्ट्रपती गनी सुखरुप बचावले आहेत. या हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, या स्फोटामागे तालिबानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, अशी माहिती अशरफ गनी यांच्या परिचयाच्या व्यक्तीने दिली.
परवानमधील हल्ला हा आत्मघाती
परवानमध्ये झालेला हा हल्ला आत्मघाती होता. हल्लेखोर बाईकवरून आला होता, असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.