Giant dome of Jakarta Islamic Centre Grand Mosque collapses after fire breaks out  esakal
ग्लोबल

Jakarta: जकार्ता इस्लामिक सेंटरला भीषण आग; मशीद झाली जमीनदोस्त

सकाळ डिजिटल टीम

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एका मोठ्या मशिदीला भीषण आग लागली आहे. या आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये मोठ्या जामा मशिदीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. (Giant dome of Jakarta Islamic Centre Grand Mosque collapses after fire breaks out )

उत्तर जकार्ता येथील जामी मशिदीच्या मोठ्या घुमटाला आग लागली आणि पाहता-पाहता तो कोसळला. साधारण दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुधवारी या मशिदीच्या नूतनीकरणाची काम चालू होते, त्यावेळी अचानक दाट काळा धूर हवेत पसरताना दिसला त्यावेळी आग लागल्याची माहिती सर्वदूर झाली.

ही मशीद जकार्ता इस्लामिक सेंटर इमारतीच्या संकुलात स्थित आहे. हे इस्लामिक अभ्यास आणि विकास या विषयावर एक थिंक टँक आहे. या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. घटनेच्या कारणाचा तपास केला जात आहे. पोलिसांनी याबाबत सांगितले की, मशिदीचे नूतनीकरण करण्याचे काम असलेल्या कंत्राटदार कंपनीच्या चार कामगारांची चौकशी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT