Ship 
ग्लोबल

सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकलेलेच; दर तासाला २८०० कोटीं रुपयांचे नुकसान

पीटीआय

इस्लामिया - इजिप्तच्या सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय मालवाहूजहाज आजही तिसऱ्या दिवशी बाजूला करण्यात यश आले नाही. जहाजातील या वाहतूक कोंडीमुळे सुमारे १५६ मालवाहू जहाजाचा प्रवास थांबला आहे. सुएझ कालवा हा जगातील व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा भूमध्य सागरला लाल समुद्राशी जोडला जातो. त्यामुळे आशियातून युरोपचे अंत कमी होते आणि परिणामी आफ्रिकेला वळसा घालण्याची गरज भासत नाही. तब्बल दहा हजार किलोमीटर अंतराची बचत होते. सुएझ कालव्यात २३ मार्चला एव्हरग्रीन नावाचे मालवाहू जहाज अडकल्याने या कालव्यात असंख्य जहाजांची कोंडी झाली आहे. हे जहाज ४०० मीटर लांब म्हणजेच तीन फुटबॉल मैदानाच्या आकाराएवढे मोठे जहाज आहे. २० हजार कंटेनर घेऊन जाणाऱ्या जहाजाची उंची दहा मजली इमारतीपेक्षा अधिक आहे. या वाहतूक कोंडीमुळे दरतासाला इजिप्तचे २८०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. कारण इजिप्तला दररोज टोल टॅक्सच्या रूपातून ६७२०० कोटी रुपये मिळतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तैवानची जहाज कंपनी एव्हरग्रीन मरिन कॉर्प्स नावाने या जहाजाची नोंद आहे. खराब हवामानामुळे हे जहाज फसल्याचे सांगितले जात आहे. लहान जहाजांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे या महाकाय जहाजातून कंटेनर हटवले जात असून जेणेकरून त्याचे वजन कमी होईल. हे जहाज चीनहून नेदरलँडला जात होते. सुएझ कालवा ॲथोरिटीच्या म्हणण्यानुसार, सुएझ कालव्यातील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी सात दिवस लागू शकतात. हे जहाज अडकल्याने जगातील आवश्‍यक वस्तूंच्या किमतीत वाढ होऊ शकते. विशेषत: पेट्रोलियम पदार्थाची किंमत वाढू शकते. कारण जगाच्या बारा टक्के व्यापार सुएझ कालव्यातून होतो. तसेच जगभरातील ३० टक्के जहाज या कालव्यातून जातात.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

SCROLL FOR NEXT