Italy News
Italy News 
ग्लोबल

आईची माया..! बाळासाठी महिला खासदाराने संसदेत... टाळ्यांचा कडकडाटाने झालं कौतुक

Sandip Kapde

आईची माया कुठेही जागृत होई शकते. या मायेला कोणती सिमारेषा देखील नसते. त्यामुळे आईला तिन्ही जगाचा स्वामी म्हटल्या जाते. इटलीच्या एका महिला खासदाराचे जोरदार कौतुक होत आहे. महिला खासदाराने भर संसदेत आपल्या बाळाला स्तनपान केले. खासदार गिल्डा स्पोर्टिएलो संसदेत आपल्या मुलाला स्तनपान करणाऱ्या पहिल्या राजकारणी ठरल्या आहेत.

गिल्डा स्पोर्टिएलो बुधवारी चेंबर ऑफ डेप्युटीज (खालच्या सभागृहात) त्यांच्या नवजात बाळाला स्तनपान करणाऱ्या प्रथम महिला ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी सर्व खासदारांनी टाळ्या वाजवल्या. इटलीच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह हे पुरुष प्रधान मानले जाते. अशा परिस्थितीत गिल्डा स्पोर्टिएलोच्या या पावलाचे खूप कौतुक होत आहे.

गिल्डा स्पोर्टिएलो संसदेत मतदान करण्यासाठी आपल्या मुलाला घेऊन आल्या होत्या. त्यांनी आधी मतदान केले आणि आपल्या बाळाला घेऊन एका बाकावर गेल्या. त्यानंतर त्यांनी बाळाला दूध पाजले. यावेळी सहकारी खासदार बराच वेळ टाळ्या वाजवत होते. संसदीय अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असलेले जॉर्जिओ मुळे म्हणाले की, सर्व पक्षांच्या पाठिंब्याने एखाद्या महिलेने आपल्या बाळाला स्तनपान देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इटलीच्या डाव्या विचारसरणीच्या फाइव्ह-स्टार मूव्हमेंट पार्टीशी संबंधित गिल्डा स्पोर्टिएलो म्हणाल्या, अनेक महिला वेळेअभावी बाळांना स्तनपान करत नाहीत किंवा त्या टाळतात. अनेक महिला वेळेपूर्वीच बाळांना स्तनपान करणे थांबवतात. अनेक महिल्या कामावर जायचे असते, त्यामुळे त्या हा निर्णय घेतात.

आजपासून जर इटलीच्या सर्वोच्च संस्थांनी कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी परिचारिका ठेवण्याची परवानगी दिली तर कोणत्याही व्यवसायातील कोणत्याही महिलेला हा अधिकार नाकारता येणार नाही, असे स्पोर्टिएलो म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT