Global deaths cross 500K cases surpass 10-mn mark
Global deaths cross 500K cases surpass 10-mn mark 
ग्लोबल

कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर; तर मृत्यूची संख्या...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या आता तब्बल १ कोटीच्या पुढे गेली असून ५ लाखांहून अधिक जणांनी यामुळे जीव गमावला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सध्या जगात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८२ हजार ६१३ इतकी आहे. तर, आतापर्यंत ५ लाख १ हजार ३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या ५४ लाख ५८ हजार ५२३ इतकी आहे. तर ४१ लाख २२ हजार ७८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगातील कोरोना रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण केवळ अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ लाखांच्या आसपास पोहोचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख २८ हजार १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ११ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर सध्या अमेरिकेत १४ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे १३ लाख रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये ५७ हजारांहून अधिक जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. रशियामध्ये कोरोनाचे ६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा ९ हजारांच्या जवळ पोहोचला आहे.
--------------
प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय
--------------
भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येनंही ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर भारतात आतापर्यंत कोरोनामुळे १६ हजारहून अधिक जणांचा बळी गेला आहे. भारतात आता ५ लाख ८ हजार ९५३ कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २ लाख ९५ हजार ८८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १ लाख ९७ हजार ३८७ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन देशभरात १५ हजार ६०० वर मृत्यू झाले आहेत. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. ही बाब भारतासाठी चांगलीच आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे १० हजार २४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ३ लाखांच्या आसपास रुग्ण देशभरात बरे झाले आहेत अशीही माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT