Global Fertility Rate
Global Fertility Rate esakal
ग्लोबल

Global Fertility Rate : जागतिक प्रजनन दराचा टक्का घसरला,भारतात काय परिस्थिती?

सकाळ डिजिटल टीम

Global Fertility Rate : चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला असला तरी भारतातील प्रजनन दरात वेगाने घसरण होत आहे. १९५० मध्ये ६.२ असलेला प्रजनन दर २०२१ मध्ये २ खाली आला असून २०५० मध्ये तो १.२९ आणि २१०० मध्ये १.०४ पर्यंत कमी होण्याचा अंदाज ‘लॅन्सेट’ नियतकालिकात व्यक्त करण्यात आला आहे.

मात्र, केवळ भारताचीच अशी अवस्था नसून एकूण जागतिक प्रजनन दरही १९५० मधील ४.८ टक्क्यांहून २०२१ मधील २.२ पर्यंत घटला आहे. तो २०५० पर्यंत १.८ आणि २१०० पर्यंत १.६ पर्यंत घटण्याची शक्यता आहे.

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (जीबीडी) २०२१ फर्टिलिटी ॲंड फोरकास्टिंग कोलॅबोरेशन्समधील संशोधकांच्या मते, संपूर्ण जगासमोरच घटत्या प्रजनन दराचे आव्हान असले तरी २१ व्या शतकात कमी उत्पन्न असणाऱ्या अनेक देशांमध्येही अजूनही प्रजनन दर अधिक आहे.

पश्चिम आणि पूर्व उप-सहारा आफ्रिकेतील काही गरीब देशांतील उच्च प्रजनन दरांमुळे जग लोकसंख्याशास्त्रीयदृष्ट्या विभाजित होईल. २०२१ ते २१०० दरम्यान जगातील सर्वाधिक गरीब देशांत जन्मणाऱ्या मुलांचा एकूण जगातील वाटा १८ टक्क्यांहून ३५ टक्क्यांवर जाईल, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, हवामान बदलाच्या वाढत्या संकटामुळे या उच्च प्रजनन दर असलेल्या गरीब देशांना वारंवार येणारे पूर, दुष्काळ, प्रचंड उष्णता आदींचा सामना करावा लागू शकतो. त्यांना अन्न, पाणी व साधनसंपत्तीच्या असुरक्षिततेलाही तोंड द्यावे लागू शकते, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. त्यासाठी, या देशांत महिलांचे शिक्षण आणि गर्भनिरोधकांमुळे उच्च प्रजनन दर आटोक्यात येऊ शकते, असेही त्यांनी सुचविले आहे.

जगभरातील विविध वयोगटांतील लोकसंख्येवर या निष्कर्षांचा आर्थिक, भू-राजकीय, अन्न सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणदृष्ट्या सखोल परिणाम होईल. देशादेशांमध्ये मध्यम ते उच्च उत्पन्न असणारे व कमी उत्पन्न असणारे अशी दरी पडू शकते, अशी भीतीही संशोधकांनी वर्तविली आहे. जोपर्यंत सर्व देशांतील सरकारे वृद्ध होणाऱ्या लोकसंख्येच्या समस्या सोडविण्यासाठी नवकल्पना राबवीत नाहीत किंवा निधीची तरतूद करत नाहीत.

तोपर्यंत, या लोकसंख्याशास्त्रीय बदलामुळे राष्ट्रीय आरोग्य विमा, सामाजिक सुरक्षा योजना आणि आरोग्य सेवांशी संबंधित पायाभूत सुविधांवर ताण येऊ शकतो,अशी चिंताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. जागतिक लोकसंख्येत सातत्याने घट झाल्यास कार्बन उत्सर्जन तसेच संसाधनांवरील ताण कमी होऊन पर्यावरणीय प्रगतीसाठी संधी उपलब्ध होऊ शकते, हेही संशोधकांनी मान्य केले आहे.

या संशोधनाचे भारतावर परिणाम होऊ शकतात. त्यात, वृद्धांची संख्या, मनुष्यबळाची कमतरता आणि लिंग प्राधान्यामुळे निर्माण होणारे संभाव्य सामाजिक असंतुलन आदींचा समावेश आहे. या समस्या आणखी काही दशकांनी उद्‌भवणाऱ्या असल्या तरी भविष्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनातून आपण आताच कृतिशील व्हायला हवे.

- पूनम मुत्रेजा, कार्यकारी संचालक, पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया

जग

  • २०२१ मध्ये जन्मलेली बालके : १२.९ कोटी

  • १९५० च्या तुलनेत वाढ : ९.३ कोटी

  • २०१६ मर्ध्य सर्वाधिक जन्मलेली बालके : १४.२ कोटी

भारत

  • २०२१ मध्ये जन्मलेली बालके : १.६ कोटी

  • १९५० मध्ये जन्मलेली बालके : २.२ कोटी

  • २०५० मध्ये जन्मणारी अपेक्षित बालके : १.३ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT