राधिका मिलिंद शहा
राधिका मिलिंद शहा  sakal
ग्लोबल

Baramati : अमेरिकेतील अतिस्थूल व्यक्तींना बारामतीच्या राधिका शहा देणार... आहाराच्या टीप्स

मिलिंद संगई, बारामती..

बारामती : अमेरिकेतील लासव्हेगास येथे होणाऱ्या अमेरिकन सोसायटी फॉर मेटॅबोलिक अँड बेरीयाट्रीक सर्जरीज (ASMBS) या जगातील सर्वोच्च संस्थेच्या वार्षिक परिषदेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी बारामतीच्या राधिका मिलिंद शहा (वाघोलीकर) यांची निवड झाली आहे.

जगभरातील नामांकित सर्जन व डायटीशियन्स यांना राधिका या परिषदेत प्रशिक्षण देणार आहे. दरवर्षी काही निवडक व संशोधन करणाऱ्या व्यक्तींना ही संधी मिळते. या नामांकित संस्थेच्या वार्षिक परिषदेमध्ये जगभरातील डॉक्टर व डायटेशन यांना प्रशिक्षण देण्यासाठी निवड होणारी राधिका शहा या पहिल्या महिला भारतीय डायटिशियन ठरल्या आहेत.

येत्या 25 जून रोजी राधिका या परिषदेसाठी अमेरिकेला रवाना होत आहेत. काही निवडक व्यक्तींनाच या वार्षिक परिषदेमध्ये आपले विचार व्यक्त करीत प्रशिक्षण देण्याची संधी मिळत असते. यंदा बारामतीच्या राधिका यांनी हा सन्मान प्राप्त करत बारामतीच्या नावलौकीकात भर घातली आहे.

याशिवाय येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये इटलीतील नेपल्स येथे होणाऱ्या इंटिग्रेटेड फेडरेशन फॉर सर्जरी ऑफ ओबेसिटी अँड मेटॅबोलिक डिस ऑर्डर (IFSO) या परिषदेमध्ये अनुभवी आहार तज्ज्ञ म्हणून राधिका हिला व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तिने या परिषदेसाठी पाठविलेला शोधनिबंध हा जगातील सर्वोच्च पहिल्या आठ शोधनिबंधामध्ये निवडला गेला आहे. राधिका शहा या परिषदेत या शोधनिबंधाचे सादरीकरण करणार आहेत.

यापूर्वी राधिका यांनी मलेशिया, बेल्जियम, इंग्लंड, फिलिपाईन्स तसेच भारतामधील सर्व अग्रगण्य परिषदांमध्ये भाग घेऊन आपला ठसा उमटविला आहे. ओबेसिटी म्हणजेच स्थूलत्व या विषयावर राधिका गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील नामांकित तज्ज्ञ डॉ. शशांक शहा यांच्या समवेत काम करीत आहेत. त्यांच्या अनेक शोधनिबंधांना जागतिक स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. कोविडच्या काळात देखील आहार कसा असायला हवा होता या बाबत त्यांनी राज्यस्तरावर काम केले आहे.

अतिस्थूल व्यक्तींना आहाराचे मार्गदर्शन करणार...

ओबेसिटी (स्थूलत्व) न्युट्रिशियनिस्ट ही नवीन संकल्पना गेल्या दहा वर्षात रुढ झाली आहे. राधिका शहा यांनी गेल्या आठ वर्षात देश व परदेशात विविध ठिकाणी काम केले आहे. त्यांच्या या अनुभवाचा विचार करुनच अमेरिकेत त्यांना प्रशिक्षणाचा सन्मान देण्यात आला आहे. अतिस्थूल व्यक्तींना कसे मार्गदर्शन करायचे, आहाराचे नियोजन कसे करायचे याचे मार्गदर्शन राधिका शहा अमेरिकेत जाऊन करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी फडणवीसच..." भाजप आमदार म्हणाला, मी तर ओपन बोलतो

Yogi Adityanath: 2022 च्या निवडणुकांपूर्वी CM योगींना हटवण्याची झाली होती तयारी, 'या' पुस्तकात धक्कादायक दावा

Viral Video: मानवी बोटानंतर आता महिलेला ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीमध्ये सापडली गोम

T20 World Cup मधील सुपर-8 आहे तरी काय, भारत-ऑस्ट्रेलिया एकाच गटात कसे? जाणून घ्या सर्व काही

IND W vs SA W: भारतीय संघाचा पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड; आशा शोभनानं 4 विकेट्स घेत गाजवलं पदार्पण

SCROLL FOR NEXT