dead body e sakal
ग्लोबल

Global News : स्वार्थासाठी मुलाचा माथेफिरुपणा; आईच्या मृतदेहासोबत तब्बल सहा वर्षे...

तुम्ही अशा अनेक कथा ऐकल्या असतील की लोक नातेवाईकांच्या मृतदेहांसोबत अनेक वर्ष राहतात. पण या माणसाचं कारण थोडं वेगळं आहे.

वैष्णवी कारंजकर

जवळच्या माणसाच्या निधनाने प्रत्येकालाच मोठा धक्का बसतो. समोरची व्यक्ती गेल्याचं सत्य पचवणं अनेकांना अवघड जातं. असाच एक किस्सा समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस दोन-चार महिने नव्हे, तर तब्बल ६ वर्षे आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहिला.

तुम्ही अशा अनेक कथा ऐकल्या असतील की लोक नातेवाईकांच्या मृतदेहांसोबत अनेक वर्ष राहतात. पण या माणसाचं कारण थोडं वेगळं आहे. त्या व्यक्तीनं हे दुःख किंवा धक्का बसल्यामुळे केलं नाही तर त्याच्या स्वार्थासाठी केलं आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मृत महिलेचे नाव हेल्गा मारिया हेंगबार्थ आहे. तिच्या मृत्यूनंतर ६ वर्षे तिच्या मुलाने तिचा मृतदेह घरात ठेवला आणि तिच्यासोबत राहत होता. त्यानं शेजाऱ्यांना सांगितलं की, आई जर्मनीत तिच्या घरी गेली, पण तिचा मृत्यू झाला होता. आपल्या मृत आईच्या नावाने पेन्शन जमा होत असल्याने तो असा करत होता. ६ वर्षांत, त्याला त्याच्या आईच्या मृतदेहाकडून सुमारे 1 कोटी 59 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे.

गेल्या ६ वर्षांपासून हेल्गाने तिच्या हेल्थ कार्डवरून काहीही केलं नाही, तेव्हा इटालियन अधिकाऱ्यांना संशय आला. जेव्हा त्यांनी घरावर छापा टाकला तेव्हा ६० वर्षांचा मुलगा तिथे नव्हता, पण पोलिसांना हेलगा यांचा मृतदेह बेडवर गुंडाळलेला आढळून आला. शवविच्छेदनानंतर हेल्गा यांचा मृत्यू ६ वर्षांपूर्वीच झाल्याचं कळलं. आता तो मृतदेहाच्या माध्यमातून पेन्शनचा दावा कसा करत राहिला याचा पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT