ग्लोबल

कोरोनाच्या साथीत क्षयरोगाचे मृत्यू वाढणार; ब्रिटनमधील संशोधनातील माहिती

पीटीआय

लंडन - कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीमुळे भारतात पुढील पाच वर्षांत क्षयरोगासंबंधित (टीबी) आणखी ९५ हजार मृत्यू होणार आहेत, अशी माहिती ‘युरोपियन रेस्पिरेटरी जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाली आहे. 

कोरोनाच्‍या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य सेवेवर ताण आला असून, क्षयरोगाचे निदान आणि उपचारास विलंब होत आहे, असे या नियतकालिकात म्हटले आहे. कोरोनाच्या साथीमुळे जगावर ‘टीबी’चा भार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असे या चाचणी स्तरावर केलेल्या या अभ्यासात आढळले आहे. भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांमधील आरोग्य सेवा सुस्थित आणि सक्षम झाली नाही तर सुमारे ‘टीबी’चे जादा एक लाख दहा हजार मृत्यू होण्याची शक्यता आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’ (एलएसएचटीएम) आणि ब्रिटनमधील लान्सकास्टर विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीपूर्वी ‘टीबी’मुळे मरण पावणाऱ्यांची दररोजची संख्या चार हजार होती. 

संशोधक म्हणतात... 
- सुरक्षित अंतराचा अभाव आणि अकार्यक्षम आरोग्य सेवेमुळे भारत, चीन, दक्षिण आफ्रिकेत मृतांचा आकडा वाढेल. 
- कोरोनाप्रमाणेच क्षयरोगाचा संसर्गही तोंड किंवा नाकावाटे बाहेर पडणाऱ्या तुषारांमुळे होतो. त्यामुळे सुरक्षित अंतराचा नियम पाळल्यास ‘टीबी’चा धोका कमी. 
- क्षयरोगाच्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी पाच वर्षांत एक लाख दहा हजार मृतांची भर पडणार 
- कोरोनामुळे आरोग्यसेवेवर प्रचंड ताण आला आहे, तेथे ‘टीबी’ची मृत्युसंख्या दोन लाखांपर्यंत पोचेल 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुढील पाच वर्षांतील संभाव्य मृत्युसंख्या 

६,००० -  चीन 
९५,००० -  भारत
१३,००० - द.आफ्रिका 

कोरोनामुळे ‘टीबी’च्या रुग्णांकडे दुर्लक्ष, निदानात आणि उपचारात विलंब होत आहे. अल्प व मध्यम उत्पन्न गटांतील देशांमधील आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याने असे होत आहे. 
फिन मॅकक्विड, सहायक प्राध्यापक, एलएसएचटीएम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT