corona
corona 
ग्लोबल

चीनचं रडगाणं सुरुच; भारत-अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलियातून कोरोना पसरल्याचा दावा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या एक वर्षांपासून कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. अद्यापही कोरोनाचा हा हाहाकार तसाच जगभर सुरु आहे. जगातील बहुतांश देशांना कोरोनाच्या या थैमानाचा जबरदस्त फटका बसला आहे. इतकंच नव्हे तर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या गडगडल्या आहेत. या साऱ्या प्रकरणाचा अध्यायच चीनमधून लिहला गेल्याचे जगमान्य आहे. परंतु, आता चीन आपल्या दुटप्पी स्वभावानुसार, हे सारं खापर आपल्या माथ्यावरुन दुसऱ्या कोणाच्या तरी माथ्यावर फोडण्यासाठी प्रयत्नशील झालेला दिसतोय. याआधी चीनने अमेरिका आणि त्यानंतर भारतातून कोरोना विषाणू पसरल्याचा आरोप केला होता. आणि आता चीनने आपला मोर्चा ऑस्ट्रेलियाकडे वळवला आहे. 

कोरोना या विषाणूचा प्रसार ऑस्ट्रेलिया या देशातूनच झाल्याचा आरोप आता चीनने लगावला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फ्रोझन मीटवर काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांनंतर चीनने आपल्या आरोपांचा मोर्चा न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडे वळवला आहे. चीनने या फ्रोझन मीटवरुन ऑस्ट्रेलियावर कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोप केला होता. मात्र, तो सिद्ध करण्यास अद्याप चीनला यश आलेलं नाहीये. याबाबतचं वृत्त चीनच्या ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालं आहे. या वृत्तानुसार, कोरोनाचा विषाणू चीनमधून नव्हे तर ऑस्ट्रेलियातून पसरल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे. या दाव्यात पुढे असंही म्हटलं आहे की, फ्रोझन फूडच्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू हा चीनच्या वुहान शहरातील बाजारात पोहोचला. आणि तिथून तो पसरला. गंमत अशी आहे की, चीननं यापूर्वीही अनेकदा याप्रकारचे उरफाटे दावे पुराव्याशिवाय केले आहे. फ्रोझन फूडवरुन अन्य देशांवर कोरोना पसरवल्याचा आरोप चीनने याआधीही केला आहे. 

ग्लोबल टाइम्सने हे दावे करताना ते सिद्ध करण्यासाठी अधिक पुराव्यांची गरज असल्याचं म्हटलं आहे. मात्र हे दावे करताना नेहमीप्रमाणे ते सिद्ध करण्यासाठी चीनकडे कसल्याही प्रकारची शास्त्रीय माहिती उपलब्ध नाहीये. आजवर अनेक तज्ञांनी कोरोनाचा विषाणू चीनमधूनच पसरल्याचा दावा केला आहे. या महासाथीचा प्रसार चीनमधील वुहान शहरातील एका बाजारातून झाल्याची माहिती जगाने मान्य केली आहे. या बाजारपेठेत प्राण्यांच्या मांसाची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते. इथूनच हा विषाणू आधी चीनमध्ये आणि मग जगभर पसरला. मात्र, चीनमध्ये या विषाणूची निर्मिती झालीच नाही, असं ग्लोबल टाइम्सचं म्हणणं आहे. चीनने यापूर्वी ब्राझील आणि जर्मनीला जबाबदार धरलं होतं. चीनचा  दावा होता की, जर्मनी आणि ब्राझीलमधून येणाऱ्या मांसामुळे कोरोना हा विषाणू चीनच्या बाजारपेठेत पोहोचला. 

चीनने भारतावरही विषाणूच्या निर्मितीचा दोषारोप ठेवला आहे. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस च्या संशोधकांनी कोरोना हा विषाणू 2019 च्या उन्हाळ्यात भारतात निर्माण झाल्याचा दावा केला होता. प्राण्यांपासून कोरोना विषाणू निर्माण होऊन तो दुषित पाण्याच्या माध्यमातून मानवी शरिरात गेला, असं चीनचं म्हणणं आहे. यानतंर तो विषाणू चीनच्या वुहान शहरात पोहोचल्यानंतर या विषाणूची जगाला ओळख झाली. त्यामुळे हा विषाणू चीनमध्ये तयार झाल्याचा जगाचा समज झाला, असं या संशोधकांचा दावा आहे. या आपल्या दाव्याला आधार देण्यासाठी चीनने फिलोजेनेटिक विश्लेषणाचा आधार घेतला होता. पण त्यांच्या या दाव्याला इतर अनेक संशोधकांनी केराची टोपली दाखवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT