laser 
ग्लोबल

Video: जखम भरुन निघणार अवघ्या काही सेंकदात; वैज्ञानिकांचा क्रांतीकारी शोध?

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या बायोमेडिकचे विद्यार्थी आणि सिडनी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी सर्जिकल ग्लुचा एक भन्नाट शोध लावला आहे. त्यांच्या या शोधामुळे अवघ्या काही सेंकदात जखम भरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी शोध असल्याचं मानलं जात आहे. 

इलॅस्टिक आणि अॅडेसिव्ह ग्लू अगदी कमी वेळात एखादी जखम भरुन काढू शकते. विशेष म्हणजे यासाठी टाके लावण्याची अजिबात गरज नाही. ग्लूला मेट्रो असं नाव देण्यात आले असून अवघ्या 60 सेकंदात यामुळे जखम भरुन येते. जेलसारखा असणारा हा पदार्थ ultraviolent light (UV) ने सक्रिय केला जातो. जखमेवर हे ग्लू लावल्यानंतर काही काळातच ते जखम भरुन काढते. 

ग्लूचा उंदीर आणि डुकरांवर यशस्वीपणे प्रयोग करुन पाहण्यात आला आहे. लवकरच याची मानवावर चाचणी घेतली जाणार आहे. biocon च्या प्रमुख किरन मुजुमदार यांनी या संधोधनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात कशा पद्धतीने अवघ्या काही सेंकदात जखम भरली जाऊ शकते हे दाखवण्यात आले आहे. मेट्रो ग्लूची इलॅस्टिसिटी जखम भरुन काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. विद्यार्थ्यांनी केलेले हे संशोधन मानवावरही यशस्वी ठरल्यास हा एक क्रांतिकारी शोध ठरणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT