Gold-Silver Rate eSakal
ग्लोबल

Gold-Silver Rate : सोने-चांदीचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता; इस्राइल-हमास युद्धाचा परिणाम

Israel War : हमास या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा केली आहे.

Sudesh

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर कमी होताना दिसत होते. मात्र, आता इस्राइल-हमास युद्धामुळे हे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फिजिकल मार्केटमध्ये सोन्याची मागणी तुफान वाढली असून, त्यामुळे सोन्याचं प्रीमियम 700 रुपये प्रतितोळा वाढले आहेत.

सोन्याचं प्रीमियम हे पूर्वी 1,300 रुपये प्रतितोळा एवढं होतं, मात्र आता ते 2,000 रुपयांवर पोहोचलं आहे. यामुळे कित्येक डीलर्स सोनं विकण्यास नकार देत आहेत. दुसरीकडे, चांदीचं प्रीमियम हे प्रतिकिलो 1,000 रुपयांनी वाढून 3,500 रुपये प्रतिकिलो एवढं झालं आहे.

यामुळेच सोनं आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर आता पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक वाढण्याची शक्यता आहे. (Business News)

सराफा बाजारात सोनं हे 5 हजार अंकांनी कोसळलं आहे, तर चांदी तब्बल 13,000 अंकांनी कोसळली आहे. त्यामुळे कित्येक दुकानदार आणि गुंतवणुकदार हे सोनं विकत घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. तर सोन्याची मागणी पाहता सध्या सोनं न विकण्याचा निर्णय कित्येक डीलर्सने घेतला आहे.

किती आहे किंमत?

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,539 रुपये प्रतितोळा एवढी आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 51,790 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 42,404 रुपये प्रतितोळा एवढी आहे. चांदीची किंमत 67,095 रुपये प्रतिकिलो एवढी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT