congo 
ग्लोबल

Video: आफ्रिकेतील देशात मिळाला सोन्याचा डोंगर; लोकांनी टोपलं भरुन नेलं घरी

सकाळन्यूजनेटवर्क

Gold mountain discovered in Congo: तुम्ही अनेक डोंगर, पर्वत पाहिले असतील. पण, जगातील एका भागात असेही डोंगर आहे, ज्याला सोन्याचा डोंगर म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. होय, आफ्रिकेमधील कांगो देशात असं एक डोंगर आहे जिथं सोनं सापडलंय. कांगोतील एका ठिकाणी सोन्याचा डोंगर सापडला आहे. ही माहिती पसरताच स्थानिक लोकांनी आपली अवजारे घेऊन येथे गर्दी केली आणि त्यांनी डोंगर खोदण्यास सुरुवात केली. यासंबंधातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात व्हिडिओमध्ये जवळपास २०० ते ३०० लोक डोंगर खोदताना दिसत आहेत. 

लोकांनी मोठ्या प्रमाणात डोंगरावर गर्दी केल्याने प्रशासनाला Luhihi गावातील डोंगराच्या खोदकामाला बंदी आणावी लागली आहे. एका व्हिडिओ जर्नलिस्टने  (Ahmad Algohbary) हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये लोक आपल्या अवजारांनी डोंगर खोदताना दिसत आहे. यातील निघालेली माती धुण्यासाठी आणि त्यातून सोने काढण्यासाठी गावकरी ही माती घरी घेऊन जाताना दिसत आहे. 

कांगो नैसर्गिक सांधनसंपत्तीने संपन्न देश  (Congo is rich in natural resource)

मिळालेल्या माहितीनुसार, कांगोमध्ये मोठ्या प्रमाणात सोने सापडते. देशातील किंमती धातूची अनेक देशांमध्ये अवैध तस्करी केली जाते. देशातील अनेक भागात सोन्याच्या खानी आहे. येथील मातीमध्ये सोने सापडल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. कांगोमध्ये सापडलेल्या या डोंगराबाबत सांगण्यात आलंय की, येथील मातीमध्ये ६० ते ९० टक्के सोने आहे. 

माहितीनुसार, कांगोमध्ये पुष्कळ नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. देशात तेल, हिरे, खनिज आणि विविध प्रकारचे लाकडे आढळतात. देशात tin, tungsten आणि tantalum चे भांडार आहेत. कांगो सरकारने तत्काळ आदेश देत खोदकाम थांबवण्यास सांगितलं आहे. शिवाय याठिकाणच्या सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT