Google Co Founder Sergey Brin Divorced Wife 
ग्लोबल

Elon Musk: इलॉन मस्कसोबत गुगलच्या सहसंस्थापकाच्या पत्नीचे प्रेमसंबंध! घेतला घटस्फोटाचा निर्णय

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गुगलचे सहसंस्थापक सर्गे ब्रिन यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. पत्नीचे अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरुन त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं. वकील आणि उद्योजक असणाऱ्या निकोले शानहान यांचे इलोन मस्क यांच्याशी प्रेमसंबंध असल्याची बातमी अमेरिकेतील वॉल स्ट्रिट जनरलने दिली होती. (Google Co Founder Sergey Brin Divorced Wife )

कोर्टातील कागदपत्रांनुसार, ब्रिन आणि शानहान यांनी २६ मे रोजी घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर आता त्यांच्या ४ वर्षीय मुलीचा ताबा कोणाकडे द्यायचा याबाबत निर्णय व्हायचा आहे. घटस्फोटाची सर्व प्रक्रिया पार पडली असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे जोडपे आता अधिकृतरीत्या वेगळे झाले आहे.

माहितीनुसार, ब्रिन आणि शानहान यांनी २०१५ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर ब्रिन यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता. २०१८ मध्ये ब्रिन आणि शानहान यांनी लग्न केले. त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. त्यानंतर २०२१ मध्ये दोघांमध्ये काही कारणामुळे वाद झाले. तेव्हापासून ते एकत्र राहत नव्हते.

शानहानचे इलॉन मस्क यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्यानंतर एक महिन्यानंतर ब्रिन यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, अशी माहिती न्यू यॉर्क पोस्टने दिलीये. २०२२ मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज केला होता. मस्क आणि शानहान या दोघांनी प्रेमसंबंध असल्याच्या वृत्ताला फेटाळले आहे.

इलॉन मस्क काय म्हणाले?

ब्रिन आणि मी मित्र आहोत. शानहान यांना मी वर्षात केवळ तीनदा भेटलो आहे. यावेळी अनेक लोक आमच्या भोवताली होते. काहीच रोमॅन्किट नव्हतं, असं स्पष्टीकरण इलॉन मस्क यांनी एक्सवर २५ जुलै २०२२ रोजी दिलं होतं. वॉट स्ट्रिट जनरलने मस्क आणि शानहान यांच्या प्रेमसंबंध असल्याची बातमी छापली होती.

शानहान यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. जाणूनबुजून अशी अफवा पसरवली जात आहे. मस्क यांच्याशी माझी केवळ ओळख आहे. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कसल्याची प्रकारचे संबंध नाहीत, असं शानहान म्हणाल्या. दरम्यान, वॉट स्ट्रिट जनरलने आपल्या वृत्तावर ठाम असल्याचं जाहीर केलं आहे.

गुगलचे सहसंस्थापक ५० वर्षीय ब्रिन जगातील नवव्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. तर शानहान (वय ३४) कॅलिफॉर्नियामध्ये वकील आहेत आणि बाय-इको संस्थेच्या अध्यक्षा आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT