Google 
ग्लोबल

ऑस्ट्रेलियाला वाटा देण्यास गूगलकडून नकार

वृत्तसंस्था

सिडनी - ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून तयार होणाऱ्या बातमी आणि माहितीच्या वापराबद्दल या कंपन्यांना गुगल आणि फेसबुक या दोन्ही सर्च इंजिन जायंट्सनी दरवर्षी सहाशे दशलक्ष डॉलर द्यावेत, हा सरकारी आदेश मान्य करण्यास गुगल ऑस्ट्रेलियाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. सरकारकडून देण्यात आलेली  आकडेवारी अवास्तव स्वरूपाची असल्याचे या कंपनीकडून सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यासंदर्भात बोलताना गुगल ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापकीय संचालक मेल सिल्व्हा म्हणाले की, ‘‘ऑस्ट्रेलियातील माध्यमांत तयार होणाऱ्या बातम्यांपासून गुगलला फार कमी उत्पन्न मिळते. तेथील ग्राहक आयोगासमोर बाजू मांडताना प्रकाशक चुकीची आकडेवारी सादर करत आहेत.’’ ट्रेजर जोश फ्रायडेनबर्ग यांनी या आयोगास देशातील माध्यम कंपन्या आणि गुगल आणि फेसबुक यांच्यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी वेगळी संहिता निश्‍चित करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे बड्या कंपन्यांना जाहिरातींमधून मिळणारा महसूल ऑस्ट्रेलियातील माध्यम कंपन्यांशी शेअर करणे शक्य होईल. न्यूज कॉर्प, सेव्हन वेस्ट मिडिया आणि नाईन एंटरटेन्मेंट या कंपन्या ऑनलाइन महसुलासाठी आग्रही आहेत.

सिल्व्हा यांचे म्हणणे

  • गुगल सर्चचा वृत्त प्रकाशकांनाच लाभ
  • तीन अब्जपेक्षाही अधिक मोफत व्हिजिट मिळाल्या
  • आमच्यामुळेच माध्यमांना २१८ दशलक्ष डॉलरचे उत्पन्न
  • माहितीचा विचार करताना अर्थशास्त्र सांभाळावे लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT