Donald Trump, America, Google 
ग्लोबल

हॅकर्स ट्रम्प यांच्याविरोधात अफवा पसरवताहेत; गुगलचा खळबळजनक दावा

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन- चीन आणि इराणच्या हॅकर्संनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्या राष्ट्रपतीपदाच्या प्रचार मोहिमेवर लक्ष्य केल्याचं गुगलनं जाहीर केलं आहे. गुगलच्या थ्रेट अ‍ॅनालिसिस ग्रुपचे(TAG) प्रमुख शेन हन्टली यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. इराणचा हॅकर्स ग्रुप APT35 ने डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेवर, तर चीनचा हॅकर्स ग्रुप APT31 ने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्या प्रचार मोहिमेला लक्ष्य केले. मात्र, कोणताही हॅकर्स ग्रुप यात यशस्वी झाला नसल्याचं हन्टली याने सांगितले. गुगलने यासंबंधी ट्रम्प आणि बायडेन यांच्या मोहिम प्रचारकांना माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी अमेरिकेच्या फेड्ररल कायदा अंमलबजावणी संचालयाला सतर्क केले आहे.

इराणच्या हॅकर्स ग्रुपने डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोहिम प्रचारकांचे खाजगी ईमेल खाते हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे, तर चीनच्या हॅकर्स ग्रुपने जो बायडेन यांच्या मोहिम प्रचारकांना लक्ष्य केले आहे. ट्रप्प आणि बायडेन यांच्या मोहिम प्रचारकांनी या बातमीची पुष्टी केली आहे. तसेच त्यांनी हॅकर्सचा डाव उधळला असल्याचं सांगितलं आहे.

मोहिमेच्या सुरुवातीपासून आम्हाला अशा प्रकारांना सामोरे जावे लागेल याची खात्री होती. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे. जो बायडेन सायबर सुरक्षेला गांभीर्याने घेतात. आम्ही नेहमीच अशा धोक्यांपासून सतर्क राहू. तसेच आमची मोहिम सुरुक्षित आहे, असं बायडेन यांच्या मोहिम प्रवक्त्याने सांगितलं आहे. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. 2016 मधील निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. त्यादृष्टीने यावेळच्या निवडणुकीत बाह्य घटकांचा प्रभाव पडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान; नांदेड, लातूर जिल्ह्यांत कहर; सात जिल्ह्यांतील १३० मंडलांना दणका

ED Notice : ‘ED’चे मोठे पाऊल!, इंटरपोलकडून पहिल्यांदाच पर्पल नोटीस जारी

Vani Accident : टॅक्टर ट्रॉलीस कारची धडक; १३ महिलांसह १४ जखमी

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

SCROLL FOR NEXT