Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

बाहेर उभी केलेली अनेक वाहने देखील आगीत जळून खाक झाली; हरियाणातील फरीदाबादेतील भयानक दुर्घटना
massive fire in a Faridabad factory

massive fire in a Faridabad factory

esakal

Updated on

massive fire in a Faridabad factory : दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी संध्याकाळी मुजेसर पोलिस स्टेशन परिसरातील सेक्टर २४ मधील एका केमिकल फॅक्टरीत स्फोट होवून भीषण आग लागली. या आगीत दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले आहे. 

जखमी झालेल्यांपैकी १२ जणांना बीके रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित २३ जणांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार कंपनीत सीएनसी मशीन वापरून मेटल शीटचे  कटिंग केले जात होते. दरम्यान आज संध्याकाळी कर्मचारी काम करत असताना, एका केमिकल ड्रमचा स्फोट झाला. एकामागून एक अनेक ड्रम फुटले, ज्यामुळे आग लागली आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली.

massive fire in a Faridabad factory
Betel Leaf : पान खाल्ल्याने ‘शुगर लेव्हल’ वाढते का? जाणून घ्या, तज्ञांचे मत!

बाहेर उभी केलेली अनेक वाहने देखील आगीत जळून खाक झाली, ज्यात कार, बाईक, जेसीबी आणि हायड्रा यांचा समावेश आहे. सीएमओ डॉ. जयंत आहुजा यांनी सांगितले की, जखमींपैकी १२ जणांना बीके हॉस्पिटलमध्ये आणि उर्वरित २३ जणांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

massive fire in a Faridabad factory
Aditi Hundia : इशान किशनची आताची गर्लफ्रेंड अन् होणारी 'नवरी' अदिती हुंडिया, आहे तरी कोण?

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. कंपनी व्यवस्थापनालाही स्पष्टीकरण मागितले आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील आणि सर्व औद्योगिक युनिट्समध्ये सुरक्षा तपासणी केली जाईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com