Gorilla Viral News esakal
ग्लोबल

Gorilla Viral News : बया, हा नर नाही तर मादी गोरिला, 4 वर्षांनी असं आलं सत्य समोर

झू ने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये केला खुलासा.

धनश्री भावसार-बगाडे

Gorilla Viral News In Marathi :

अमेरिकेच्या एका प्राणीसंग्रहालायातून (झू) एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना अचानक समजले की, गेली चार महिने ज्याला आपण नर गोरिला समजत होतो तो खरंतर मादी आहे. त्या मादीने एका पिल्लाला जन्म दिल्यावर हे सत्य समोर आले. ही घटना ओहियो मधल्या कोलंबस झू मध्ये घडली. टीमने याविषयीची पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करत माहिती दिली.

त्यांनी इस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, आमच्याकडे तुम्हाला सांगण्यासारखे एक आश्चर्यकारक घटना आहे. आमचे गोरिला कुटुंब थोडं मोठं होत आहे. पण यात एक अविश्वसनीय भाग असा की आमच्या टीमला आताच माहित झालं आहे की ज्याला ते नर गोरिला समजत होते तो वास्तविक मादी गोरिला आहे. वृत्तानुसार या गोरिलाचे नाव सुली आहे. ती २०१९ पासून आपल्या आईसोबत राहत आहे.

यामागचे कारण

झूच्या अधिकाऱ्यांच्या ब्लॉगनुसार अशी परिस्थिती येण्यामागचं कारण म्हणजे गोरिलाच्या तरुण अवस्थेत त्यांचं लिंग सांगणे फार कठिण असते. त्यात सांगितलं आहे की, साधारण ८ वर्षापर्यंत नर आणि मादी साधारणपणे एकाच आकाराचे दिसतात. आणि त्यांच्याकडे प्रमुख लैंगिक अवयव नसतात.

प्राणी संग्रहालयाने सांगितले की, जसजसे या गोरिलांचे वय वाढू लागते तसे त्यांचे भिन्न लिंग स्पष्ट होऊ लागतात. त्यामुळे नर आणि मादी वेगवेगळे दिसू लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT